Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: शाब्बास! धारावीकर करणार प्लाझ्मा दान; मुंबईकरांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 06:33 IST

कोविडमुक्त व्यक्तींची पालिका करणार तपासणी

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा संसर्ग झाला आणि मग पालिका-राज्य शासन अशा सर्वच यंत्रणांसमोर नवे आव्हान निर्माण झाले. दाटीवाटीच्या परिसरात एका छोट्याशा झोपडीत पाचपेक्षा अधिक राहणाऱ्या व्यक्ती अशा बिकट स्थितीतही पालिकेच्या यंत्रणांनी हे आव्हान पेलून धारावीच्या झोपडपट्टीतील संसर्ग रोखला. त्यामुळे मागील काही दिवसांत चिंतातुर असलेले हेच धारावीकर आता मात्र मुंबईकरांसाठी खंबीरपणे उभे राहणार आहेत.

कोविडमुक्त झालेले धारावीकर आता प्लाझ्मा दान करणार असून त्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. धारावीत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची पालिकेकडून तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत रुग्ण वैद्यकीयदृष्ट्या सक्षम ठरतील अशा व्यक्तींकडून प्लाझ्मा घेण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

धारावीतील बरे झालेल्या काही रुग्णांची पुढच्या पाच दिवसात तपासणी करणार आहोत. त्यातील प्लाझ्मा दान करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम अशांकडून शिबिरात प्लाझ्मा घेण्यात येणार आहे. त्यासाठी हे शिबिर देशात एक वेगळा उपक्रम ठरणार आहे.

अशी होते नागरिकांची तपासणी ; गंभीर रुग्णांवर होणार उपचार

धारावीत आतापर्यंत २ हजार ४९२ जण बाधित झाले. त्यातील २ हजार ९५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १४७ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिबिराच्या माध्यमातून जे प्लाझ्मा उपलब्ध होतील त्यातून पालिका रुग्णालयात उपचार घेणाºया गंभीर रुग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणार आहेत.

च्प्लाझ्मा उपचार पद्धतीने रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे समोर आले. पालिकेच्या काही रुग्णालयांत प्लाझ्मा उपचार पद्धती यशस्वी झाल्यानंतर गंभीर रुग्णांवर या थेरपीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे येण्याचे आवाहन पालिकेसह राज्य सरकारने केले. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेऊन प्लाझ्मा उपलब्ध करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई