'We Unbeatable' Best in America's Got Talent of mumbai | अमेरिकाज गॉट टॅलेंटमध्ये मुंबईचा ‘वी अनबिटेबल’ सर्वोत्तम

अमेरिकाज गॉट टॅलेंटमध्ये मुंबईचा ‘वी अनबिटेबल’ सर्वोत्तम

वॉशिंग्टन : जागतिक कलागुणांची दखल घेणाऱ्या व त्यांचा गौरव करणाºया अमेरिकाज गॉट टॅलेंट या रिअ‍ॅलिटी शोमध्ये वसई-भार्इंदरमधील ‘वी अनबिटेबल या डान्स ग्रुपने पहिला क्रमांक पटकाविला आहे. ही स्पर्धा अमेरिकेमध्ये सोमवारी पार पडली. या यशाबद्दल वी अनबिटेबल नृत्यपथकातील कलाकारांचे सायमन कोवेल, हैदी क्लूम, आलेशा डिक्सन, होवी मंडेल या परीक्षकांनी व प्रेक्षकांनी उभे राहून अभिनंदन केले.

राम-लीला या हिंदी चित्रपटात अभिनेता रणवीरसिंग याच्यावर चित्रीत झालेल्या भन्नाट गाण्यावर नृत्य सादर केले. ट्रॅव्हिस बेकर याच्या ड्रमवादनानेही वातावरणात रंगत आणली. या रिअ‍ॅलिटी शोमध्ये कॅनडा, जर्मनी, अमेरिका आदी ४० देशांचे संघ सहभागी झाले होते. सादरीकरणाने प्रभावित झालेले परीक्षक होवी मंडेल यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, डान्सरनी रंगमंचावर प्रवेश केला, त्या क्षणापासूनच ते काहीतरी वेगळे करून दाखविणार असे वाटले होते व तसेच झाले. 

मित्राची आठवण जागती ठेवली

‘वी अनबिटेबल’ या वसई-भार्इंदरमधील नृत्यपथकामध्ये २९ जणांचा समावेश होता. या नृत्यपथकाचे मूळ नाव अनबिटेबल असे होते. मात्र त्यांचा विकास नावाचा सहकारी नृत्याच्या सरावाच्या वेळी मरण पावल्यानंतर नृत्यपथकाचे वी अनबिटेबल असे नामांतर करण्यात आले. प्रत्येक कलाकाराच्या शर्टमागे विकास हे नाव लिहिलेले असते. यातील सर्व लहान मुले व युवक गरीब व निम्नमध्यम वर्गातील आहेत.

Web Title: 'We Unbeatable' Best in America's Got Talent of mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.