Join us  

'राज ठाकरेंमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात'; बाळा नांदगांवकरांनी दिली 'ती' वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 1:30 PM

बाळा नांदगांवकरांनी आज शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवास्थानी जाऊन त्यांना ही वीट दिली. 

मुंबई: माजी आमदार आणि मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगांवकर यांनी मनसेप्रमुखराज ठाकरे यांना बाबरी प्रकरणावेळी आणलेली वीट दिली. बाळा नांदगांवकरांनी आज शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवास्थानी जाऊन त्यांना ही वीट दिली. 

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरीचा ढाचा पाडला. त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक शिवसैनिक गेले होते. त्यात बाळा नांदगावकर होते, त्यांनी त्यातली एक वीट मला दिली, असं राज ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. या विटेचं वजन बघा. मजबूत आहे कारण त्यावेळी टेंडर निघत नव्हते. हा ढाचा पाडल्याचा पुरावा आहे. आता मला नवीन बांधलेल्या राम मंदिराची सुद्धा एक वीट आणायची आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. तसेच आज स्वर्गीय बाळासाहेब असते तर आनंद झाला असता. आता मला मंदिराचीसुद्धा एक वीट आणायची आहे, असंही राज ठाकरेंनी सांगितले. 

बाळा नांदगांवकर म्हणाले की, राज ठाकरेंमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात. मी ही वीट ३२ वर्षे जपून ठेवली होती. कारसेवा करायला गेलो होतो, तेव्हा दोन वीट आणल्या होत्या. त्यावेळी काय सुचलं माहिती नाही, पण मी या दोन वीटा आणल्या होत्या. त्यातली एक वीट माझगावमधील माझं कार्यालय होतं, शिवसेनेचं ते बांधताना वापरली होती. आता ते कार्यालय यशवंत जाधवांकडे आहे. असो, हरकत नाही. तो माझा जुना सहकारी आहे, असं बाळा नांदगांवकर म्हणाले. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेअयोध्याबाळा नांदगावकर