Join us  

'ईव्हीएमवर लोकांचा विश्वास नाही, बॅलोट पेपरनेच मतदान घ्यायला हवं'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 9:20 PM

बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असला तरी तो आम्ही मानत नाही, असे म्हणत ईव्हीएमच्या मुद्द्यावरुनही प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देबिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असला तरी तो आम्ही मानत नाही, असे म्हणत ईव्हीएमच्या मुद्द्यावरुनही प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे.

मुंबई - बिहार व अन्य राज्यांत भाजपाने चांगले यश मिळविले. त्यामुळे मोदी व भाजपा यांची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट होते. बिहारच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रभारी म्हणून काम पाहणारे देवेंद्र फडणवीस यांनी या विजयानंतर बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत. "बिहारच्या जनतेने त्यांना विकास हवा असून जंगलराज नको आहे हे दाखवून दिल्याचे म्हटले आहे. बिहारच्या निवडणूक निकालानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एड. प्रकाश आंबेडकर यांनी हा विजय आम्हाला मान्य नसल्याचं म्हटलं आहे.   

बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असला तरी तो आम्ही मानत नाही, असे म्हणत ईव्हीएमच्या मुद्द्यावरुनही प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला काटावर बहुमत मिळाले आहे. 125 जागा जिंकत बिहारच्या मैदानात नितीश कुमार यांचा जेडीयू, भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीने बाजी मारली आहे, असे असले तरी आपण हा एनडीएचा विजय मानत नाही. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान फायदा करुन घेण्यासाठी भाजपचा बिहारमध्ये दंगली घडवण्याचा डाव होता. पण भाजपचा हा डाव आम्ही पूर्णत्वास जाऊ दिला नाही, असा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी केला आहेत. तसेच, ईव्हीएम मशिनच्या मतदानावर लोकांचा विश्वास नाही. निवडणुका ह्या बॅलोट पेपरवरच घ्यायला हव्यात, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

भाजपाने मोठं यश मिळवलं

देशातील 11 राज्यांमधील पोटनिवडणुकींमध्येही भाजपाने मोठं यश मिळवलं आहे. बिहारबरोबरच या राज्यांमध्ये जनतेने भाजपाला मिळालेला कौल हा मोदींवरील विश्वासाचे प्रतिक आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणाबरोबरच अन्य राज्यातील आमच्या भाजपा कार्यकर्त्यांचेही मी अभिनंदन करतो. या सर्व निवडणुकींमधील विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी जे मार्गदर्शन केलं, जे कष्ट घेतले त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

"देशाची दिशाभूल करणाऱ्यांनाही धडा मिळाला"

"बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारत एनडीएच्या विकासवादाची निवड केली आहे. हा प्रत्येक बिहारवासीयाच्या आशा आणि आकांक्षांचा विजय आहे. या निवडणुकीमध्ये जनतेने ज्या उत्साहानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या धोरणांना समर्थन दिलं ते नक्कीच उल्लेखनीय आहे. या निकालामुळे मोदी सरकारच्या कोरोनाविरुद्धच्या यशस्वी लढाईत गरीब, मजूर, शेतकरी आणि तरूण वर्गाचा विश्वास दिसून आलाच, पण त्याचबरोबर देशाची दिशाभूल करणाऱ्यांनाही धडा मिळाला" असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. 

मोदींकडून जनतेचे आभार

बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले आहेत. भाजपच्या मुख्यालयात विजयाचा जल्लोष करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. बिहारच्या जनतेनं जंगलराजला नाकारून विकासाला, सुशासनाच्या बाजूनं कौल दिल्याचं मोदी म्हणाले. कोरोना संकट काळातही मतदार बाहेर पडून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचं मोदींनी म्हटलं.

टॅग्स :प्रकाश आंबेडकरबिहार विधानसभा निवडणूकऔरंगाबादएव्हीएम मशीन