Join us

आम्ही तेव्हाही आणि आता शिवसेनेसोबत नाही - राधाकृष्ण विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 02:06 IST

पर्यावरण मंत्री व शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपाच्या विरोधात एकत्र येण्यासाठी काँग्रेसला किंवा आपल्याला कोणताही प्रस्ताव दिलेला नव्हता.

मुंबई : पर्यावरण मंत्री व शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपाच्या विरोधात एकत्र येण्यासाठी काँग्रेसला किंवा आपल्याला कोणताही प्रस्ताव दिलेला नव्हता. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे या शिवसेनेच्या भूमिकेशी आम्ही कधीही सहमत नव्हतो आणि नाही, त्यामुळे कदम यांचे बोलणे फार गांभीर्याने घ्यावे असे वाटत नाही, असे प्रत्युत्तर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि राष्टÑवादी एकत्र आल्यामुळे शिवसेनेचा महापौर होऊ शकला नाही. सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्यासाठी आम्ही काँग्रेस आणि राष्टÑवादीला प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. त्यावर विखे म्हणाले की, आमचे फक्त ५ नगरसेवक असल्यामुळे आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. आम्ही राष्टÑवादीसोबत गेलो असतो तरीही आमचा महापौर झाला नसता. आम्ही जशी भूमिका घेतली होती तशीच राष्टÑवादीने घ्यायला हवी होती. नगरच्या घटनेचा परिणाम आघाडीवर होणार नाही.

टॅग्स :राधाकृष्ण विखे पाटील