On the way to BJP, Udayan Raje met the Chief Minister; Statement regarding flood victims | खासदार उदयनराजे भाजपच्या वाटेवर?, मुख्यमंत्र्यांना भेटले; पूरग्रस्तांबाबत दिले निवेदन
खासदार उदयनराजे भाजपच्या वाटेवर?, मुख्यमंत्र्यांना भेटले; पूरग्रस्तांबाबत दिले निवेदन

मुंबई : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला उधाण आले आहे.
देशभर मोदीलाट असतानाही उदयनराजेंच्या लोकसभा विजयाने साताºयात उदयनराजेंशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी सिद्ध केले. उदयनराजेंचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी स्नेहपूर्ण संबंध आहेत. सूत्रांनी सांगितले की उदयनराजेंनी भाजपमध्ये यावे यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. उदयनराजेंचे चुलत भाऊ शिवेंद्रसिंह भोसले हे साताºयाचे आमदार असून दोघांमधून विस्तव जात नाही, अशी स्थिती आहे. शिवेंद्रसिंह यांनी अलिकडेच राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
उदयनराजेंच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार आजची मुख्यमंत्र्यांशी भेट ही पूरग्रस्तांच्या समस्या मांडण्यासाठी होती. या समस्यांबाबतचे निवेदनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

पवार वेगळे भेटले अन् उदयनराजे वेगळे भेटले
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच पूरग्रस्तांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, उदयनराजे हे त्यांच्यासोबत नव्हते. त्यांनी मुख्यमंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट घेतली.


Web Title: On the way to BJP, Udayan Raje met the Chief Minister; Statement regarding flood victims
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.