क्रिएटिव्हीटीच्या दारात भारत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 09:42 IST2025-05-11T09:41:47+5:302025-05-11T09:42:12+5:30

वेव्हज २०२५ पूर्वी भारताकडे अपार क्षमता होती. पण या सर्व क्षमतांना एकसंध करणारा सुसंगत मंच नव्हता.

waves 2025 india at the doorstep of creativity | क्रिएटिव्हीटीच्या दारात भारत

क्रिएटिव्हीटीच्या दारात भारत

संजय गायकवाड, एमडी, यूएफओ

वेव्हज २०२५ पूर्वी भारताकडे अपार क्षमता होती. पण या सर्व क्षमतांना एकसंध करणारा सुसंगत मंच नव्हता. जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्मिती करणारा देश अशी आपली नेहमीच ओखळ होती. आपल्याकडे दरवर्षी १५०० ते २००० चित्रपट विविध भाषांमध्ये निर्माण केले जातात. २०२४ च्या अखेरीस ८८६ दशलक्ष इंटरनेट यूजर्स, म्हणजेच सुमारे ५८ टक्के लोकसंख्या इंटरनेटशी जोडलेली होती. डिजिटल प्रेक्षक वर्ग वेगाने वाढत होता आणि कंटेंटचा खप प्रचंड प्रमाणात वाढत होता. फक्त ओटीटी बाजारच २०२४ मध्ये ४.५ अब्ज अमेरिकी डॉलर इतका होता आणि तो २०३३ पर्यंत २७.२ अब्ज अमेरिकी डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. तरीही, या प्रभावी आकडेवारीनंतरसुद्धा भारतातील क्रिएटिव्ह क्षेत्रे स्वतंत्रपणे, एकमेकांपासून तुटलेल्या स्वरूपात काम करत होती. त्यामुळे समन्वय, सहकार्य आणि नावीन्यतेला वाव नव्हता. आणि नेमकी हीच उणीव वेव्हज २०२५ च्या माध्यमातून भरून निघाली.

वेव्हज ही एक क्रांतिकारी परिषद आहे, ज्याने कथाकथन, तंत्रज्ञान, धोरणे आणि गुंतवणूकदार यांच्यातील दरी भरून काढली. १४० हून अधिक सत्रं आणि १०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय वक्त्यांसह, हा कार्यक्रम अनेक मोठ्या हॉल्समध्ये झाला, ज्यामध्ये प्रत्येकी १००० पेक्षा अधिक तज्ज्ञ सहभागी झाले होते. या विलक्षण संमेलनाने संवाद आणि भागीदारीसाठी एक अभूतपूर्व व्यासपीठ निर्माण केलं आणि भारताला जागतिक मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात नेतृत्व करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले.

वेव्हज २०२५ ला गेम चेंजर म्हणण्याचं कारण म्हणजे त्याने भारताचे जागतिक क्रिएटिव्ह इकॉनॉमीतलं स्थान नव्याने निर्माण केलं. आता भारत फक्त कंटेंट वापरणारा देश राहिलेला नाही, तर जगभरातील मंचांवर स्वतःचा कंटेंट तयार करणारा आणि वितरित करणारा देश होत आहे. भारताचे क्रिएटर इकॉनॉमी दरवर्षी अंदाजे ३५० अब्ज अमेरिकी डॉलर इतका खर्च करते आणि २०३० पर्यंत हा खर्च १ ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हाच तो वेव्हज २०२५ वेग आहे, जो भारतातील क्रिएटर्सना अत्याधुनिक तंत्रज्ञान, जागतिक नेटवर्क्स आणि अनुकूल धोरणांपर्यंत पोहचवू शकेल.

भविष्याचा वेध घेत भाष्य करायचे तर, वेव्हज २०२५ च्या माध्यमातून निर्माण झालेली गती आगामी परिषदेद्वारे आणखी मजबूत होणार आहे. ही परिषद भारताच्या विविध सर्जनशील क्षेत्रांना एकत्र आणेल. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीस चालना देतील आणि नवकल्पनांमध्ये गुंतवणूक वाढवतील. या भक्कम पायावर उभं राहत, भारत २०३० पर्यंत १०० अब्ज अमेरिकी डॉलर इतकी क्रिएटिव्ह इकॉनॉमी बनण्याचा मानस निश्चित केला आहे.

वेव्हज २०२५ हा केवळ एक इव्हेंट नसून भारतभरातील क्रिएटर्सना सामर्थ्य देणारी एक चळवळ आहे. ही भारताच्या सांस्कृतिक समृद्धतेला आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीजना जागतिक स्तरावर नेण्याची एक सशक्त खुण आहे.

Web Title: waves 2025 india at the doorstep of creativity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई