पश्चिम उपनगरांना जल दिलासा; नऊ कोटींचा खर्च; २१ ठिकाणी दुरुस्तीची कामे, पुरवठा सुरळीत करण्यावर महापालिकेचा भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 10:56 IST2025-12-13T10:53:19+5:302025-12-13T10:56:52+5:30
पश्चिम उपनगरांतील पाणी समस्येच्या तक्रारींबाबत तेथील आमदारांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत बैठक घेतली.

पश्चिम उपनगरांना जल दिलासा; नऊ कोटींचा खर्च; २१ ठिकाणी दुरुस्तीची कामे, पुरवठा सुरळीत करण्यावर महापालिकेचा भर
मुंबई : मागील काही महिन्यांपासून पश्चिम उपनगरांत पाणी समस्या भेडसावत असल्याने तेथील रहिवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पालिकेने तेथील जुन्या जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरांतील असमान पाणी वितरणास गळतीही कारणीभूत असल्याने आवश्यकता असेल तिथे दुरुस्ती केली जाणार आहे. जलअभियंता विभागाकडून जवळपास २१ ठिकाणी दुरुस्ती तसेच जलवाहिनी बदलीसाठी नऊ कोटी रुपयांहून अधिकच खर्च केला जाणार असून, त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
पश्चिम उपनगरांतील पाणी समस्येच्या तक्रारींबाबत तेथील आमदारांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत बैठक घेतली. पाणी पुरवठ्याचे नियोजन, जुन्या जल वाहिन्यांच्या तातडीच्या दुरुस्तीची गरज आणि भविष्यातील जलस्रोत वाढविण्यासाठी आवश्यक दीर्घकालीन उपाययोजना, यावर या बैठकीत चर्चा झाली होती.
कामे हाती घेताना काळजी आवश्यक
क्राँक्रिटचा रस्ता असल्यास तेथे कटिंग करून पुन्हा योग्य प्रकारे काँक्रिट टाकावे.
नव्याने बसवलेल्या पाइपलाइनची हायड्रॉलिक चाचणी बंधनकारक आहे.
जुन्या पाइपलाइनमुळे अडथळा निर्माण होणाऱ्या भागात काँक्रिट बेसवर पुनर्स्थापना करणे आवश्यक.
गरजेनुसार एमएमआरडीए, वाहतूक पोलिस तसेच सर्व विभागांशी पूर्व परवानगी, समन्वय आवश्यक.
पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी गरजेनुसार क्रॉस-कनेक्शन देण्यात येणार आहेत.
‘या’ वॉर्डांमधील अशी आहेत प्रस्तावित कामे
‘के पूर्व’ आणि ‘के पश्चिम’ वॉर्ड : जेव्हपिडी स्कीम, गुलमोहर रोड, जुहू, लक्ष्मीनगर-गुलमोहर रोड कनेक्शन, मथुरादास रोड आदी ठिकाणी जुन्या जलवाहिन्या बदलण्याचे प्रस्ताव आहेत. अनेक ठिकाणी १५० ते ३०० मिमी व्यासाची नवीन पाइपलाइन बसवली जाणार आहे.
‘एच पूर्व’ : माहिम-सांताक्रुझ परिसरात सध्याची १५०-२५० मिमी जलवाहिन्याची क्षमता वाढवण्याची कामे अपेक्षित आहेत. काही रस्ते विस्तारीकरण व क्रॉस-कनेक्शनसाठी जलवाहिनी बदल आवश्यक असल्याचे अहवालात नमूद आहे.
‘पी उत्तर’, ‘पी दक्षिण’ वॉर्ड :
मालाड, गोरेगाव, वर्सोवा, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे लगतचे भाग, वाघबाबा नगर, वेल्स्टेड रोड आदी भागांत मोठ्या प्रमाणावर सुधारणा प्रस्ताव आहेत.