मुंबईत तीन टप्प्यांत ‘वॉटर मेट्रो’ प्रकल्प; मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:43 IST2026-03-18T12:42:44+5:302026-03-18T12:43:49+5:30

 पहिल्या टप्प्याच्या खर्चासाठी १५०० कोटी मंजूर, जलवाहतुकीला लवकरच गती

Water Metro project in Mumbai in three phases; Chief Minister announces | मुंबईत तीन टप्प्यांत ‘वॉटर मेट्रो’ प्रकल्प; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईत तीन टप्प्यांत ‘वॉटर मेट्रो’ प्रकल्प; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यांत कार्यान्वित करण्यात येणार असून, यादृष्टीने शिपयार्ड विकसित करण्यासाठी जागा निश्चिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथे जलवाहतूक संदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली सुरू झाली. 

यावेळी यांनी शिपयार्डसाठी जागा उपलब्ध होण्याकडे प्राधान्य देत या जलवाहतूक व शिपयार्ड प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले. 

कुठे सिपयार्ड विकसित करणार? 
 बैठकीत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्यासह महाराष्ट्र सागरी मंडळाचे सदस्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. उपस्थित होते. यावेळी जलमार्ग, विविध बंदरे विकास, सागरी प्रवासी वाहतूक प्रकल्प यांची सविस्तर माहिती सादर करण्यात आली आहे. 
यावेळी नांदगाव, दिघी , विजयदुर्ग येथे शिपयार्ड विकसित करणे, मुंबई महानगर क्षेत्रात जलमार्ग कार्यान्वित करणे, ग्रीन फील्ड शिप बिल्डिंग क्लस्टर विकसित करणेबाबत सादरीकरण करण्यात आले.  या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पहिल्या टप्प्याचा खर्च १५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

अशी असेल मुंबई वॉटर मेट्रो
११ नवीन जलमार्ग : २४ नवीन टर्मिनल्स- २१५ किमी
जल मार्ग/टर्मिनल्सचे आधुनिकीकरण : २१ मार्ग, २० टर्मिनल्स- १२५ किमी
एमएमआर प्रदेशातील एकूण जल मार्गाची लांबी : ३४० किमी
सन २०३१ पर्यंत वार्षिक ७.५ कोटी जल प्रवासी संख्या.
नागरी, नौकानयन आणि आपत्कालीन पायाभूत सुविधा :
३,४३६ कोटी रुपये सागरी पायाभूत सुविधा
इलेक्ट्रिक/हायब्रीड जहाजे (बोटी) संख्या: २०७ - 
खासगी ऑपरेटर- ३,१५६ कोटी रुपये

Web Title : मुंबई में वाटर मेट्रो परियोजना तीन चरणों में शुरू होगी: मुख्यमंत्री घोषणा।

Web Summary : मुंबई में जल परिवहन के लिए वाटर मेट्रो परियोजना तीन चरणों में शुरू होगी। मुख्यमंत्री फडणवीस ने शिपयार्ड विकास के लिए भूमि आवंटन का निर्देश दिया। पहले चरण की लागत ₹1500 करोड़ है। परियोजना का लक्ष्य जलमार्गों का आधुनिकीकरण, टर्मिनलों का विकास और 2031 तक यात्री क्षमता को 7.5 करोड़ तक बढ़ाना है।

Web Title : Mumbai's Water Metro Project to unfold in three phases.

Web Summary : Mumbai's Water Metro project will be implemented in three phases. Chief Minister Fadnavis directed land allocation for shipyard development. The first phase costs ₹1500 crore. The project aims to modernize waterways, terminals, and increase passenger capacity to 7.5 crore by 2031 with 340 km of waterways.