Join us  

मुंबईत जानेवारीपासून पाणीकपात लागू ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 2:59 AM

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आजच्या घडीला ७७ टक्केच जलसाठा तलावांमध्ये ...

मुंबई : मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आजच्या घडीला ७७ टक्केच जलसाठा तलावांमध्ये आहे. त्यामुळे मुंबईत पाण्याचे टेन्शन वाढत असून नवीन वर्षात पाणीकपातीचे संकट मुंबईकरांवर घोंघावत आहे.मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावांमधून मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. यापैकी १५० दशलक्ष लीटर पाणी भिवंडी आणि ठाण्याला दिले जाते.

मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र १ आॅक्टोबर रोजी तलावांमध्ये ९१ टक्के जलसाठा जमा झाला. परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे उर्वरित नऊ टक्के जलसाठ्याची तफावत निर्माण झाली. याचा फटका पाणी वितरणाच्या टोकाला राहणाºया विभागांना बसत आहे. गेल्या महिन्यात दक्षिण मुंबईत पाणीबाणी निर्माण झाली होती. मंत्र्यांच्या बंगल्यातीलही पाणी गायब झाले होते. हा तांत्रिक बिघाड असल्याचा दावा करीत पालिकेच्या जल अभियंता खात्याने पाण्याची समस्या सोडवली होती. पाणीप्रश्नावर स्थायी समितीची बैठक तहकूब तर महापालिकेच्या महासभेत विरोधकांनी सभात्याग केला होता. तरीही पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून होत होता. परंतु, तलावांमध्ये आता ७७ टक्के जलसाठा शिल्लक असून पुढच्या जुलैपर्यंत पाणीपुरवठा होण्यासाठी लवकरच पाणीकपात लागू करण्याची वेळ महापालिकेवर येणार आहे. 

टॅग्स :मुंबईपाणीपुणे