Join us

दक्षिण मुंबईत पाणीप्रश्न पेटला, आता कफ परेड कोरडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 03:47 IST

दक्षिण मुंबईत काही दिवसांपासून पाणीप्रश्न पेटला आहे. मंत्रालयासमोरील १९ शासकीय बंगल्यांनंतर कफ परेडमध्ये शुक्रवारी दिवसभर पाणीबाणी निर्माण झाली.

मुंबई : दक्षिण मुंबईत काही दिवसांपासून पाणीप्रश्न पेटला आहे. मंत्रालयासमोरील १९ शासकीय बंगल्यांनंतर कफ परेडमध्ये शुक्रवारी दिवसभर पाणीबाणी निर्माण झाली. याचे पडसाद उमटत असल्याने या समस्येचे मूळ शोधण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांचे पथक शनिवारी फोर्ट, कुलाबा विभागाची पाहणी करणार आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांमध्ये १० टक्के जलसाठा कमी आहे. याचा परिणाम मुंबईतील पाणीपुरवठ्यावर होणार नाही, अशी हमी पालिका प्रशासनाने दिली होती. मात्र पाणीबाणी गुरुवारी मंत्री व विरोधी पक्ष नेत्यांच्या बंगल्यांपर्यंत पोहोचली. तर शुक्रवारी कफ परेडमधील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. तांत्रिक अडचणींमुळे ही पाणीटंचाई निर्माण झाली आहे, असा दावा अधिकारी करीत आहेत. २६ आॅक्टोबरला जल विभागाच्या कामकाजाविरोधात आंदोलन करणार असल्याचे आमदार राज पुरोहित यांनी सांगितले.

टॅग्स :पाणी