Watch on private hospitals in Mumbai too, make a complaint on this e-mail id | मुंबईत खासगी रुग्णालयांवरही वॉच, या ई-मेल आयडीवर करा तक्रार

मुंबईत खासगी रुग्णालयांवरही वॉच, या ई-मेल आयडीवर करा तक्रार

मुंबई : खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी ८० टक्के खाटा राखून ठेवण्यात आल्या आहेत. तरीही रुग्णांना वणवण करावी लागत असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत आहेत. तसेच राखीव खाटांवर उपचार घेणाºया रुग्णांकडून शासकीय दरानुसार शुल्क आकारणी होण्याऐवजी काही ठिकाणी दामदुप्पट वसुली केली जात असल्याच्या तक्रारी होत्या. यावर चाप लावण्यासाठी पाच सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये सनदी अधिकारी मदन नागरगोजे, अजित पाटील, राधाकृष्णन, प्रशांत नारनवरे आणि सुशील खोडवेकर यांचा समावेश आहे. गेल्याच महिन्यात महापालिकेच्या व शासकीय रुग्णालयांच्या समन्वयाचे दायित्व या सनदी अधिकाºयांवर सोपविण्यात आले होते.

ईमेलद्वारे नोंदवा तक्रारी...एखाद्या खासगी रुग्णालयाबाबत रुग्णांना किंवा रुग्णांच्या आप्तांना काही तक्रार किंवा सूचना करायची असल्यास संबंधित सनदी अधिकाºयांकडे ईमेलद्वारे आपली तक्रार नोंदविता येणार आहे.

च्मदन नागरगोजे - बॉम्बे हॉस्पिटल, सैफी रुग्णालय, जसलोक रुग्णालय, ब्रीच कँडी रुग्णालय, एच. एन. रिलायन्स रुग्णालय, भाटिया रुग्णालय, कॉनवेस्ट व मंजुळा एस बदानी जैन इस्पितळ आणि एस.आर.सी.सी. हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी आहे.
covid19nodal1@mcgm.gov.in
च्अजित पाटील - मसिना रुग्णालय, वोक्हार्ट हॉस्पिटल, प्रिन्स अली खान रुग्णालय, ग्लोबल रुग्णालय, के. ज.े सोमय्या रुग्णालय, गुरू नानक इस्पितळ आणि पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल यांचे दायित्व आहे. covid19nodal2@mcgm.gov.in

च्राधाकृष्णन - एस. एल. रहेजा रुग्णालय, लीलावती इस्पितळ, होली फॅमिली रुग्णालय, सेव्हन हिल्स हॉस्पिटल (रिलायन्स), बी.एस.इ.एस. रुग्णालय, सुश्रुषा रुग्णालय आणि होली स्पिरिट हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी आहे. covid19nodal5@mcgm.gov.in

च्सुशील खोडवेकर - कोहिनूर रुग्णालय, हिंदू सभा रुग्णालय, एस. आर. व्ही. चेंबूर रुग्णालय, गॅलेक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, एल. एच. हिरानंदानी इस्पितळ, सुराणा सेठिया रुग्णालय आणि फोर्टीस रुग्णालयांची जबाबदारी आहे. covid19nodal4@mcgm.gov.in

च्प्रशांत नारनवरे - करुणा रुग्णालय, कोकिळाबेन रुग्णालय, संजीवनी रुग्णालय, नानावटी रुग्णालय, अपेक्स रुग्णालय आणि अपेक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी आहे. covid19nodal3@mcgm.gov.in

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Watch on private hospitals in Mumbai too, make a complaint on this e-mail id

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.