प्रभाग क्रमांक १ ओबीसीसाठी झाला राखीव; तेजस्वी घोसाळकर यांची भावनिक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 19:44 IST2025-11-11T19:43:00+5:302025-11-11T19:44:28+5:30
प्रभाग क्रमांक १ साठी दि,४ नोव्हेंबर रोजी पालिकेचा २ कोटींचा विकासनिधी आल्याने घोसाळकर या प्रभाग क्रमांक १ मधून निवडणूक लढवणार अशी चर्चा दहिसर कर आणि राजकीय वर्तुळात होती,मात्र सदर प्रभाग ओबीसी झाल्याने या चर्चांना स्वल्पविराम मिळाला आहे.

प्रभाग क्रमांक १ ओबीसीसाठी झाला राखीव; तेजस्वी घोसाळकर यांची भावनिक प्रतिक्रिया
मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी झालेल्या वॉर्ड आरक्षण लकी ड्रॉमध्ये प्रभाग क्रमांक १ ओबीसी (इतर मागासवर्गीय) प्रवर्गासाठी राखीव ठरला आहे. या निर्णयानंतर येथील माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत सोशल मीडियावर त्यांनी येथील जनतेला उद्देशून निवेदन जारी केले आहे.
प्रभाग क्रमांक १ साठी दि,४ नोव्हेंबर रोजी पालिकेचा २ कोटींचा विकासनिधी आल्याने घोसाळकर या प्रभाग क्रमांक १ मधून निवडणूक लढवणार अशी चर्चा दहिसर कर आणि राजकीय वर्तुळात होती,मात्र सदर प्रभाग ओबीसी झाल्याने या चर्चांना स्वल्पविराम मिळाला आहे.
“मी ओबीसी प्रवर्गातील नसल्याने या निवडणुकीत उमेदवारी दाखल करता येणार नाही. हे दुःखद आहे, कारण माझ्या वॉर्डातील आणि दहिसर विधानसभा मतदारसंघातील जनतेची सेवा पुढे अधिकृतपणे करता येणार नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.
घोसाळकर पुढे म्हणाल्या की, पती अभिषेकच्या दि,८ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या अकाली निधनानंतर मला घोसाळकर कुटुंबासह दहिसर व बोरिवलीतील प्रत्येक नागरिकाकडून अपार प्रेम, विश्वास आणि पाठिंबा लाभला. हा बंध कायम राहील. निवडणूक लढवण्याची संधी न मिळाली तरी मी सदैव नागरिकांच्या सामाजिक, वैयक्तिक किंवा नागरी समस्यांसाठी सदैव उपलब्ध राहीन.ही केवळ घोषणा नसून माझी मनापासूनची वचनबद्धता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.