Join us

वैष्णोदेवीला जायचे आहे? लगेच मिळेल रिझर्व्हेशन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 05:56 IST

पश्चिम रेल्वेद्वारे प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष भाडे असलेल्या रेल्वे गाड्या चालविल्या जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पश्चिम रेल्वेद्वारे प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष भाडे असलेल्या रेल्वे गाड्या चालविल्या जाणार आहेत. यात ०९०९७/०९०९८ वांद्रे टर्मिनस-वैष्णोदेवी कटडा एसी सुपरफास्ट स्पेशल साप्ताहिकच्या २२ फेऱ्यांचा समावेश आहे. ०९०९७ वांद्रे टर्मिनस-वैष्णोदेवी कटडा एसी सुपरफास्ट स्पेशल प्रत्येक रविवारी वांद्रे टर्मिनस येथून २१:५० वाजता सुटेल. मंगळवारी १० वाजता कटडा येथे पोहोचेल. 

ही रेल्वे गाडी २१ एप्रिल ते ३० जूनदरम्यान चालविली जाईल. ०९०९८ वैष्णोदेवी कटडा-वांद्रे टर्मिनस एसी सुपरफास्ट स्पेशल प्रत्येक मंगळवारी कटडा येथून २१:४० वाजता सुटेल. गुरुवारी १०:१० वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल. ही गाडी २३ एप्रिल ते २ जुलैपर्यंत चालविली जाईल. रेल्वे गाड्या दोन्ही दिशांना बोरीवली, वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, गंगापूर सिटी, मथुरा, दिल्ली सफदरजंग, अंबाला कैंट, ढंडारी कला, जालंधर कैंट, पठाणकोट आणि जम्मू तवी स्थानकांवर थांबतील.

टॅग्स :मुंबईरेल्वे