तुमच्या वाहनासाठी ‘०००१’ नंबर हवाय? मग मोजा सहा लाख रुपये; वडाळा आरटीओत नवीन नोंदणी मालिका सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 10:42 IST2026-02-11T10:27:19+5:302026-02-11T10:42:27+5:30

सर्व नोंदणी क्रमांकांमध्ये ‘०००१’ या क्रमांकाला सर्वाधिक मागणी असते. या क्रमांकासाठी अनेकदा २० लाख रुपयांहून अधिक बोली लावली जाते. 

Want a '0001' number for your vehicle? Then count six lakh rupees; New registration series starts at Wadala RTO | तुमच्या वाहनासाठी ‘०००१’ नंबर हवाय? मग मोजा सहा लाख रुपये; वडाळा आरटीओत नवीन नोंदणी मालिका सुरू

तुमच्या वाहनासाठी ‘०००१’ नंबर हवाय? मग मोजा सहा लाख रुपये; वडाळा आरटीओत नवीन नोंदणी मालिका सुरू

मुंबई - वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) खासगी कारच्या नोंदणीसाठी ‘एमएच-०३-एफडी’ ही नवीन नोंदणी मालिका बुधवार, ११ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुचाकींसाठीची एमएच-०३- इएक्स ही मालिका संपत आल्याने नवीन मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे वाहनासाठी ‘०००१’ या क्रमांक मिळवता येणार असून, यासाठी ११ फेब्रुवारीला दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज सादर करावा, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाहनाचा नोंदणी क्रमांक हा अनेकांसाठी केवळ ओळख नसून वैयक्तिक पसंती आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे आरटीओकडून असे ‘फॅन्सी नंबर’ शुल्क आकारून उपलब्ध करून दिले जातात.

नऊ कोटी ६९ लाखांचा महसूल
जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत वडाळा आरटीओमधून ५,७७५ फॅन्सी क्रमांकांची विक्री झाली असून, त्यातून परिवहन विभागाच्या तिजोरीत नऊ कोटी ६९ लाख ५३ हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे. नवीन मालिका सुरू झाल्याने अशा क्रमांकांसाठी पुन्हा  संधी उपलब्ध झाली आहे.

...तर लिलाव पद्धतीने वाटप
सर्व नोंदणी क्रमांकांमध्ये ‘०००१’ या क्रमांकाला सर्वाधिक मागणी असते. या क्रमांकासाठी अनेकदा २० लाख रुपयांहून अधिक बोली लावली जाते. एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लिलाव पद्धतीने त्याचे वाटप केले जाते, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.  अशा आकर्षक क्रमांकांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे गेल्या काही वर्षांत बोली रकमेतील वाढ सातत्याने होत असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. 

फॅन्सी नंबर मिळवण्यासाठी परिवहन संकेतस्थळावर मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडीच्या मदतीने ओटीपी मिळवून नोंदणी करावी. उपलब्ध असलेल्या ‘चॉइस’ क्रमांकांमधून आवडीचा क्रमांक निश्चित करा. त्याचे पैसे ऑनलाइन भरा. एका क्रमांकासाठी अधिक अर्ज आल्यास त्यासाठी लिलावाची प्रक्रिया ऑफलाइन ठेवण्यात येत असून, त्या क्रमांकासाठी अधिकचे पैसे मोजणाऱ्याला त्या क्रमांकाची ऑफलाइन पावती देण्यात येते.

Web Title : अपनी गाड़ी के लिए चाहिए '0001'? तो दीजिए 6 लाख!

Web Summary : वडाला आरटीओ ने 'एमएच-03-एफडी' पंजीकरण श्रृंखला शुरू की। '0001' नंबर 11 फरवरी तक आवेदन द्वारा उपलब्ध। फैंसी नंबरों से भारी राजस्व। एक से अधिक आवेदन मिलने पर सबसे ऊंची बोली लगाने वाला विजेता; ऑनलाइन आवेदन करें।

Web Title : Want '0001' for your vehicle? Pay ₹6 Lakh!

Web Summary : Wadala RTO starts new registration series 'MH-03-FD'. '0001' number available via application by February 11th. Fancy numbers generate significant revenue. Highest bidder wins if multiple applications received; apply online.