Join us  

वाडिया रुग्णालय सुरू राहणार; आवश्यक निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे बैठकीत आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 4:07 AM

निधीसोबतच अन्य मुद्द्यांवर येत्या १० दिवसांत निर्णय घेऊन हे रुग्णालय सुरू राहील

मुंबई : महापालिका आणि राज्य शासन हे आवश्यक तो निधी वाडिया रुग्णालयास उपलब्ध करून देतील, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. त्यामुळे वाडिया रुग्णालय सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निधीअभावी वाडिया रुग्णालय बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली.

निधीसोबतच अन्य मुद्द्यांवर येत्या १० दिवसांत निर्णय घेऊन हे रुग्णालय सुरू राहील, तसेच येथील कर्मचाऱ्यांच्या नोकºयादेखील अबाधित राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीला नस्ली वाडिया यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.महापालिका अखेर २२ कोटींचे अनुदान देणाररुग्णालयाला शिस्त लावण्यासाठी अनुदान रोखल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्थायी समितीमध्ये सांगितले. परंतु स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी गरीब रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी रोखलेले २२ कोटी रुपयांचे अनुदान तत्काळ वाडिया रुग्णालयाला देण्याचे निर्देश दिले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेवाडिया हॉस्पिटल