Join us

Wadala Vidhan Sabha Election Result 2024 : कालिदास कोळंबकरांचा वर्ल्ड रेकॉर्ड! वडाळ्यातून नवव्यांदा झाले आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 12:28 IST

Wadala Assembly Election 2024 Result : वडाळा विधासभा मतदारसंघातून कालिदास कोळंबर यांनी विजयी आघाडी घेतली आहे.

Wadala Vidhan Sabha Election Result 2024 : मुंबईतील वडाळा विधानसभेच्या मतमोजणी अखेरच्या टप्प्यात आली असून भाजपचे कालिदास कोळंबकर विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. वडाळ्यात भाजपचे कालिदास कोळंबकर आणि शिवसेनेचे उद्धव गटाच्या श्रद्धा जाधव यांच्यात निकराची लढत झाली. ही जागा मुंबईतील महत्त्वाच्या जागांपैकी एक आहे, जिथे दोन्ही प्रमुख पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. वडाळ्यातल्या जनतेने आपला प्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा कालिदास कोळंबर यांची निवड केली आहे. त्यामुळे कालिदास कोळंबर हे नवव्यांदा आमदार झाले आहेत.

वडाळा विधानसभा मतदारसंघातून कालिदास कोळंबर यांनी सुरुवातीपासून निर्णायक आघाडी घेतली होती.  १९९० ते २०१९ अशा आठ विधानसभा निवडणुकीत सलग निवडून येण्याचा विक्रम आमदार कालिदास कोळंबकर यांच्या नावावर आहे. नवव्यांदा विजय मिळवून कालिदास कोळंबर यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

एवढ्या वर्षांचा अनुभव, एवढ्या वर्षांची माझी बॅटिंग या मतदारसंघात आहे. जनतेला जे पाहिजे ते मी देतोय. त्यामुळे निवडणुकीची कोणतीही भीती मला नाही. मी या मतदारसंघातून सहज निवडून येईन, असा विश्वास निवडणुकीआधी कालिदास कोळंबर यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे आता निकालानंतर कालिदास कोळंबकर यांनी केलेलं भाकित खरं ठरल्याचे पाहायला मिळत आहे.

१६ व्या फेरीची मतमोजणी सुरु असताना कालिदास कोळंबकर यांना ६६८०० मते मिळाली आहेत. तर ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव यांना ४१८२७ मते मिळाली होती. कोळंबकर यांनी २४९७३ मतांनी श्रद्धा जाधव यांचा पराभव केला आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024वडाळामुंबई विधानसभा निवडणूककालिदास कोळंबकर