महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलानुसार, मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या महायुतीने स्पष्ट वर्चस्व निर्माण केले. मुंबई महानगरपालिकेत महायुती सध्या १०० हून अधिक जागांवर आघाडीवर असून, बहुमताचा आकडा पार करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. या निकालांवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला विकास ब्रँडचा विजय असे संबोधले आहे.
महानगरपालिकेच्या निकालानंतर माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांचे आभार मानले. ते म्हणाले की, "आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली. केवळ भावनिक राजकारण करणाऱ्यांना आणि विकासाला विरोध करणाऱ्यांना मतदारांनी चोख उत्तर दिले. मुंबईच्या जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिला असून, विकास ब्रँडला स्वीकारले आहे."
एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते म्हणाले की, "आजच्या निकालांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा कोण चालवत आहे? हे सिद्ध केले आहे. पंतप्रधान मोदींचे मुंबईला जागतिक केंद्र बनवण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करू. गेल्या तीन वर्षांत आम्ही जो विकासाचा वेग धरला होता, तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अधिक जोमाने पुढे नेला जाईल. मुंबईबाहेर गेलेल्या मध्यमवर्गीय मुंबईकरांना पुन्हा शहरात आणणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे."
मुंबईसोबतच ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीतही महायुतीने आपली पकड मजबूत केल्याचे चित्र असून, या विजयामुळे राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची ताकद अधिक वाढली आहे.
Web Summary : Eknath Shinde hails BMC election results as a victory for development. He credited voters for prioritizing development over emotional issues, indirectly criticizing Uddhav Thackeray. Shinde pledged to fulfill Modi's vision for Mumbai and bring back middle-class residents. The Mahayuti's strong performance strengthens Shinde-Fadnavis's position.
Web Summary : एकनाथ शिंदे ने बीएमसी चुनाव परिणामों को विकास की जीत बताया। उन्होंने मतदाताओं को भावनात्मक मुद्दों पर विकास को प्राथमिकता देने का श्रेय दिया, अप्रत्यक्ष रूप से उद्धव ठाकरे की आलोचना की। शिंदे ने मुंबई के लिए मोदी के दृष्टिकोण को पूरा करने और मध्यम वर्ग के निवासियों को वापस लाने का वादा किया। महायुति के मजबूत प्रदर्शन से शिंदे-फडणवीस की स्थिति मजबूत हुई।