Join us
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी ३ आॅक्टोबरला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 04:45 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी कृषिमंत्री दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी येत्या ३ आॅक्टोबरला निवडणूक होणार आहे.

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी कृषिमंत्री दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी येत्या ३ आॅक्टोबरला निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत सोमवारी ही घोषणा केली. विधानसभेत भाजपा-शिवसेना युतीचे बहुमत आहे. त्यात भाजपाचे संख्याबळ १२२ इतके आहे. त्यामुळे अन्य कोणी पक्ष आपला उमेदवार देण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडून द्यावयाची ही जागा आहे. ३१ मे २०१८ रोजी फुंडकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.

टॅग्स :विधान परिषद