Join us

विवेक ओबेराॅयचा मेव्हणा आदित्य अल्वाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 03:13 IST

‘सँडलवूड’ ड्रग्सप्रकरण; पार्ट्यांमध्ये ड्रग्स पुरविल्याचा आराेप

बंगळुरू : कन्नड सिनेसृष्टीला हादरवून साेडणाऱ्या ड्रग्स प्रकरणात अभिनेता विवेक ओबेराॅयचा मेव्हणा आदित्य अल्वा याला अखेर अटक करण्यात आली आहे. ताे सप्टेंबर २०२० पासून फरार हाेता. बंगळुरू पाेलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला चेन्नईतून ताब्यात घेतले.

आदित्य अल्वाने विराेधातील एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी न्यायालयातही धाव घेतली हाेती. राहत्या घरी पार्ट्यांचे आयाेजन करून तेथे ड्रग्स पुरविण्यात येत असल्याचा आराेप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. कन्नड सिनेसृष्टीतील ड्रग्स प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आल्यानंतर एका अभिनेत्रीलाही अटक करण्यात आली हाेती. त्यानंतर आदित्यचे नाव समाेर आले हाेते. तेव्हापासून ताे फरार हाेता. त्याचा शाेध घेण्यासाठी मुंबईसह विविध शहरांमध्ये छापे मारण्यात आले हाेते. अखेर ताे चेन्नईमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. ताे सातत्याने चेन्नईतून ठिकाण बदलत हाेता. ताे परत येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अखेर त्याला शिताफीने अटक करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताे त्याच्या दाेन मित्रांसाेबत राहत हाेता. आपण केवळ पार्टीचे आयाेजन करत हाेताे. ड्रग्सचे सेवन हाेत असल्याबद्दल माहिती नसल्याचा दावा आदित्यने केला आहे. (वृत्तसंस्था)

पत्नीलाही चौकशीसाठी बोलावलेn बंगळुरू पाेलिसांनी विवेक ओबेराॅयच्या घराचीही झडती घेतली हाेती. तसेच त्याच्या पत्नीलाही चाैकशीसाठी बाेलाविण्यात आले हाेते. आदित्यच्या व्यवसायांमध्ये तिचीदेखील भागीदारी आहे.n आदित्यचे ‘हाऊस ऑफ लाइफ’ या नावाने बंगळुरूमध्ये आलिशान घर आहे. ते एका तलावाकाठी असून सुमारे ४ एकर परिसरात हा बंगला बांधण्यात आला आहे. याठिकाणी अनेकदा हाय प्राेफाइल पार्ट्यांचे आयाेजन व्हायचे. बंगळुरूतील अनेक उच्चभ्रू व्यक्तींचा त्यात सहभाग असायचा.

 

टॅग्स :गुन्हेगारीविवेक ऑबेरॉय