Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘’कोरोना जाण्यासाठी विठ्ठलाने चमत्कार करावा, मग हे काय करणार?’’ नितेश राणेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 21:15 IST

कोरोनाला रोखण्यासाठी विठ्ठलाला चमत्कारासाठी साकडे घालणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

मुंबई - कोरोनाच्या सावटाखाली आज पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी साजरी झाली यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्यावतीने विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. तसेच राज्यावर आलेले कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाला साकडे घातले. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी विठ्ठलाला चमत्कारासाठी साकडे घालणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, मुख्यमंत्री होण्यासाठी पवार साहेबांनी चमत्कार केला. आमदार होण्यासाठी मोदी साहेबांनी चमत्कार केला. आता कोरोना जाण्यासाठी विठ्ठलाने चमत्कार करावा, मग हे काय करणार???

विठ्ठलाची महापूजा केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की,  राज्यातील कोरोनाचे संकट दूर कर, आनंदी, निरोगी राहू दे असे साकडे घातले. मला अशा संकटाच्या काळात विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळेल असे कधीच वाटले नव्हते अशी खंत ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेनिलेश राणे पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर