Join us

बोरीवली येथील अटल स्मृती उद्यानाला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 12:47 IST

Atal Smriti Udyan at Borivali : राज्यपालांचे अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन 

मुंबई: भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोरीवली, पश्चिम  येथील अटल स्मृती उद्यान येथे जाऊन वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. अटल स्मृती उद्यान परिसराला भेट देऊन राज्यपालांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी खासदार गोपाल शेट्टी, लदाखचे खासदार जाम्यांग छेरिंग नामग्याल, माजी मंत्री विनोद तावडे, स्थानिक आमदार सुनील राणे, आमदार भाई गिरकर, आमदार योगेश सागर व आमदार  मनिषा चौधरी तसेच नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते. 

राज्यपालांनी अटल स्मृती उद्यानाला भेट देऊन तेथील वाजपेयी यांच्या जीवनावरील दृकश्राव्य प्रदर्शन पहिले. राज्यपालांनी तेथे निर्माण केलेली संसद भवनाची प्रतिकृती पहिली तसेच वाजपेयी यांच्या जीवनावरील आभासी प्रश्नमंजुषेत सहभाग घेतला.   

टॅग्स :अटलबिहारी वाजपेयीमुंबई