Join us
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास नांगरे पाटलांचे बनावट फेसबुक खाते !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 06:48 IST

अधिकृत आयडीवरून स्वतः च केली पोलखोल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आयपीएस अधिकारी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांचे बनावट फेसबुक अकाउंट बनवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नांगरे पाटील यांनी स्वत: याबाबत फेसबुकवर पोस्ट टाकत ही माहिती देऊन भामट्यांची पोलखोल केली आहे.

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हा विश्वास नांगरे पाटील असल्याचे भासवून लोकांशी चॅट करत आहे.  त्यांचे मोबाइल नंबर मागत आहे. अशा पोस्ट स्वतः नांगरे पाटील यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंट वरून शेअर करत नागरिकांनी याला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.  सायबर पोलिस तपास करत आहेत.

नांगरे पाटील लिहितात

‘’नमस्कार मित्रांनो, काही घोटाळेबाजांनी माझ्या नावावर बनावट खाते तयार केले आहे आणि माझ्या काही संपर्कांना खाली दिलेले संदेश पाठवत आहेत. मी तातडीने कायदेशीर कारवाई करत आहे; परंतु कृपया प्रतिसाद देऊ नका किंवा कोणत्याही प्रकारची माहिती सामायिक करू नका कारण ती फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे! धन्यवाद.

टॅग्स :मुंबई पोलीसपोलिस