Join us
Daily Top 2Weekly Top 5

#Virushka विरुष्काच्या लग्नासंबंधीचं ट्विट बनलं 'गोल्डन ट्वीट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 15:54 IST

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानं 11 डिसेंबरला कुटुंब व खास मित्र परिवाराच्या साक्षीनं लग्न थाटलं.

मुंबई - टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानं 11 डिसेंबरला कुटुंब व खास मित्र परिवाराच्या साक्षीनं लग्न थाटलं. लग्नबेडीत अडकणार असल्याची गोड बातमी विरुष्कानं प्रसिद्धी माध्यमं किंवा सोशल मीडियावर कुठेही न सांगता थेट इटलीमध्ये विवाहसोहळा शानदार रचला.  मात्र दोघांकडूनही अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर येत नसल्यानं विरुष्काच्या लग्नाची बातमी सत्य आहे की निव्वळ अफवा हेच समजत नव्हतं.  

मात्र अखेर अनुष्कानं ट्विटर अकाऊंटवर विराट कोहलीसोबत लग्नबेडीत अडकल्याचा फोटो शेअर करत सर्वांना सुखद धक्का दिला. आता अनुष्काचे हेच ट्विट बॉलिवूडसाठी 2017 वर्षातील 'गोल्डन ट्वीट' बनले आहे. विराट-अनुष्काच्या लग्नासंबंधीचं ट्विट यावर्षी सर्वाधिक वेळा रीट्विट करण्यात आलेल्या ट्विट्सपैकी एक असल्याची अधिकृत माहिती ट्विटरनं दिली आहे.  अनुष्कानं लग्नाचा फोटो पोस्ट करत ट्विट केले होते की, 'आज आम्ही एकमेकांना कायमस्वरूपी प्रेमबंधनात बांधण्याचं वचन घेतलं आहे', आणि काही वेळातच विराट-अनुष्काच्या लग्नाचा फोटो असलेले हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. 

 

विराट आणि अनुष्काचं लग्न इटलीतील बोर्गो फिनोखिएतो रिसॉर्टमध्ये पार पडलं. हे रिसॉर्ट प्रचंड महागडं आणि ऐतिहासिक आहे. या रिसॉर्टमध्ये केवळ 5 सुइट्स, 5 व्हिला आणि फक्त 22 खोल्या आहेत. ज्यामध्ये जवळजवळ 44 लोक राहू शकतात. याशिवाय स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट आणि स्पा सारख्या इतरही गोष्टी आहेत. फोर्ब्सच्या ताज्या रिपोर्टनुसार, हे रिसॉर्ट जगातील दुसरं महागडं हॉलिडे डेस्टिनेशन आहे. या रिसॉर्टमध्ये एका दिवसासाठी तब्बल 15,000 डॉलर मोजावे लागतात. 

नुष्कीसाठी अंगठी शोधायला विराटला लागले तीन महिने

अनुष्कासाठीची अंगठी शोधण्यासाठी विराटला तब्बल तीन महिने लागले असल्याची चर्चा आहे. विराटनं अनुष्कासाठी जी अंगठी निवडली ती प्रचंड महागडी आणि खास आहे. या अंगठीमध्ये एक खास हिराही बसवण्यात आला आहे. ऑस्ट्रियाचा एका डिझायनरनं ही अंगठी तयार केली आहे. या अंगठीची खासियत म्हणजे, ही अंगठी तुम्ही जेवढ्या अँगलमधून पाहाल तितक्यांदा तिची डिझाइन वेगवेगळी दिसेल. या अंगठीची किंमत तब्बल 1 कोटी असल्याचीही चर्चा आहे. 

टॅग्स :विराट अनुष्का लग्नविराट कोहलीअनुष्का शर्माविरूष्काबॉलीवूडक्रिकेट