विराट-अनुष्काचा अनोखा संकल्प!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 14:42 IST2018-06-24T14:42:17+5:302018-06-24T14:42:36+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचीच सर्वत्र सध्या चर्चा पाहायला मिळते. गेल्या वर्षी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी इटलीतील तस्कनीमध्ये विवाहबंधनात अडकले. मात्र,  काम आणि भारतीय क्रिकेट संघाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे या जोडप्यांना एकत्र वेळ घालवण्यास मिळत नाही.

Virat Anushka's unique resolution! | विराट-अनुष्काचा अनोखा संकल्प!

विराट-अनुष्काचा अनोखा संकल्प!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचीच सर्वत्र सध्या चर्चा पाहायला मिळते. गेल्या वर्षी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी इटलीतील तस्कनीमध्ये विवाहबंधनात अडकले. मात्र,  काम आणि भारतीय क्रिकेट संघाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे या जोडप्यांना एकत्र वेळ घालवण्यास मिळत नाही. म्हणूनच या दोघांनी वर्षांतले 21 दिवस क्रिकेट आणि अभिनयापासून चार हात लांब राहून एकमेकांसोबत वेळ घालवण्याचे ठरविले आहे. 
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाचे दौरे सुरू होते. तर लग्नानंतर काही दिवसांत अनुष्कादेखील ‘झिरो’च्या सेटवर परतली होती. त्यामुळे या दोघांनाही हवा तेवढा वेळ एकत्र घालवता आला नाही. विराटचे येणाऱ्या काळातील क्रिकेटचे वेळापत्रकही व्यग्र आहे. त्यातच, अनुष्का ‘झिरो’बरोबरच ‘मेड इन इंडिया’, ‘सुई धागा’ या चित्रपटातही दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटांच्या शूटिंगसाठी अनुष्का बिझी असणार आहे.  
यासोबतच, अनेक उत्पादन कंपन्यांचे अनुष्का आणि विराट सदिच्छा दूत आहेत त्यामुळे पुढचे किमान दोन एक वर्षे या दोघांचेही वेळापत्रक खूपच व्यग्र असणार आहे. येणा-या काळातही कामावरच्या निष्ठेपोटी त्यांना एकमेकांना हवा तेवढा वेळ देता येणार नाही. म्हणूनच यातून मार्ग काढत या दोघांनी वर्षांतले 21 दिवस एकमेकांसोबत घालवायचे ठरविले आहे. या काळात अभिनय आणि क्रिकेटपासून लांब राहून फक्त दोघांनी वेळ घालवायचा असा संकल्प त्यांनी केला आहे.
 

Web Title: Virat Anushka's unique resolution!