विक्रोळी आणि डोंगरीत दोघांच्या आत्महत्या

By Admin | Updated: December 27, 2016 01:44 IST2016-12-27T01:44:50+5:302016-12-27T01:44:50+5:30

डोंगरी आणि विक्रोळी परिसरात दोघांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी डोंगरी आणि विक्रोळी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Vikhroli and the two suicides in the mountain | विक्रोळी आणि डोंगरीत दोघांच्या आत्महत्या

विक्रोळी आणि डोंगरीत दोघांच्या आत्महत्या

मुंबई : डोंगरी आणि विक्रोळी परिसरात दोघांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी डोंगरी आणि विक्रोळी पोलीस अधिक तपास करत आहेत.
विक्रोळी टागोरनगर परिसरात मुलायम सभापती यादव तीन मुले आणि पत्नीसोबत राहतात. रविवारी रात्री त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी दाखल झालेल्या विक्रोळी पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला आहे. त्यांची पत्नी अजूनही बेशुद्धावस्थेत असून विक्रोळीच्या महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विक्रोळी पोलीस अधिक तपास करत आहेत.
डोंगरी परिसरात राहणाऱ्या शिबा लिंडो या तरुणीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी डोंगरी पोलीस अधिक तपास करत आहेत. या आत्महत्येमागचे गूढ कायम असून तपास सुरू आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Vikhroli and the two suicides in the mountain