विजय पाटकर, अमृता राव यांचा ‘ऑल आर्टिस्ट’कडून सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 05:03 IST2025-11-11T05:02:31+5:302025-11-11T05:03:10+5:30

Vijay Patkar: ऑल आर्टिस्ट फाऊंडेशनसारखी संस्था कलाकारांच्या पाठीशी उभी राहते, त्यांना मदतीचा हात देते, ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. पण, ही संस्था उभी राहिली, कारण अखिल भारतीय चित्रपट महामंडळ कमी पडले, अशी टीका प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक विजय पाटकर यांनी केली.

Vijay Patkar, Amrita Rao honored by 'All Artists' | विजय पाटकर, अमृता राव यांचा ‘ऑल आर्टिस्ट’कडून सन्मान

विजय पाटकर, अमृता राव यांचा ‘ऑल आर्टिस्ट’कडून सन्मान

पुणे  - ऑल आर्टिस्ट फाऊंडेशनसारखी संस्था कलाकारांच्या पाठीशी उभी राहते, त्यांना मदतीचा हात देते, ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. पण, ही संस्था उभी राहिली, कारण अखिल भारतीय चित्रपट महामंडळ कमी पडले, अशी टीका प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक विजय पाटकर यांनी केली. त्यावर फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी चित्रपट महामंडळाच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी यावेळी केली.

ऑल आर्टिस्ट फाऊंडेशनच्या पाचव्या वर्धापनदिन सोहळ्यात विजय पाटकर यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे आणि अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तर वाद्यवृंद संगीत क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल श्याम ऐडवणकर यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्यामची आई ‘चित्रपट २०२३ च्या निर्मात्या अमृता राव यांच्यासह अथर्व सुदामे, दीप्ती धोत्रे, अभिनेत्री-निर्माती मेघा धाडे, गायक नंदेश उमप आदी कलाकारांना कलाभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर ऑस्करचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

उतारवयातील संघर्ष खूप मोठा 
गिरीश प्रभुणे म्हणाले, कलाकारांचे झगमगाटाचे आयुष्य आणि त्यानंतरचा उतारवयातील जीवनाचा संघर्ष खूप मोठा आहे. आजचे जीवन धावपळीतले आहे.   मानसिकदृष्ट्या समाज चांगला रहावा यासाठी कलाकारांचे जीवन उत्तम असणे आवश्यक आहे. कलाकारांमध्ये स्पर्धा असते. पण कलाकारांना एकत्र आणणे हीच कौतुकाची बाब आहे. संस्थेचे कार्य पाहून भारावून गेले असल्याचे सांगत अमृता राव यांनी संस्थेकडून देण्यात आलेल्या रकमेत तेवढ्याच रकमेची वाढ करून कलाकारांसाठी ही रक्कम सुपूर्द केली.   यावेळी मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर, फाैंडेशनचे कार्याध्यक्ष बबलू खेडकर, उपाध्यक्ष गणेश गायकवाड व फाैंडेशनच्या उप सचिव अश्विनी कुरपे उपस्थित होत्या.
 

Web Title : विजय पाटकर, अमृता राव 'ऑल आर्टिस्ट' फाउंडेशन द्वारा सम्मानित

Web Summary : विजय पाटकर ने ऑल आर्टिस्ट फाउंडेशन कार्यक्रम में फिल्म निकाय की कमियों की आलोचना की। पाटकर और श्याम एडवलकर को लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार मिला। अमृता राव और अन्य को भी सम्मानित किया गया।

Web Title : Vijay Patkar, Amrita Rao Honored by 'All Artist' Foundation

Web Summary : Vijay Patkar criticized film body's shortcomings at All Artist Foundation event. Patkar and Shyam Addwalkar received lifetime achievement awards. Amrita Rao and others were also honored for their contributions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.