Vidhan Sabha 2019: कोट्यधीश असूनही वाहन नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 05:26 IST2019-10-06T05:26:15+5:302019-10-06T05:26:38+5:30
भायखळा विधानसभा मतदार संघातून यामिनी यशवंत जाधव यांना सेनेतून उमेदवारी मिळाली आहे.

Vidhan Sabha 2019: कोट्यधीश असूनही वाहन नाही
मुंबई : कोट्यवधीची संपत्ती असलेल्या भायखळा विधानसभा मतदार संघाच्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांच्याकडे एकही वाहन नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आहेत.
भायखळा विधानसभा मतदार संघातून यामिनी यशवंत जाधव यांना सेनेतून उमेदवारी मिळाली आहे. यामिनी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, त्यांच्या नावे ६ कोटी २२ लाख तर पतीच्या नावे ३ कोटी ६७ लाखांची संपत्ती आहे.
या दाम्पत्यांकडे एकत्रितरीत्या दहा कोटींची संपत्ती असूनही त्यांच्याकडे एकही वाहन नसल्याचे म्हटले आहे.
यामिनी जाधव यांच्यावर
२ कोटी ६५ लाख २ हजार ५५२ रुपयांचे कर्ज आहे, तसेच
त्यांच्याकडे १७ लाखांचे सोने आहे. पतीच्या नावे पाच लाखांचे सोने-चांदी आहे.