विधानभवन बोगस पास: पाच जणांना मुंबई पोलिसांनी केली अटक; मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:35 IST2026-03-27T13:27:32+5:302026-03-27T13:35:19+5:30

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी बोगस पास विकल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, यात मंत्रालय आणि विधानभवनातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

Vidhan Bhavan bogus pass: Mumbai Police arrests five people; Ministry employees also included | विधानभवन बोगस पास: पाच जणांना मुंबई पोलिसांनी केली अटक; मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश

विधानभवन बोगस पास: पाच जणांना मुंबई पोलिसांनी केली अटक; मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश

विधिमंडळ अधिवेशन काळात प्रवेश पास दिले जातात. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोगस पास विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये मंत्रालयातील दोन आणि विधानभवनातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

मुंबई पोलिसांनी सांगितले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात विधानभवनात बनावट पासचा वापर करून प्रवेश केल्याच्या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. दत्तात्रय गुंजाळ याने मुख्यमंत्री कार्यालयात सल्लागार असल्याचे बनावट पासवर लिहिलेले होते. 

या प्रकरणात मंत्रालयातील दोन आणि विधानभवनातील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. 

मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस यांनी दाखल झालेल्या गुन्ह्यात दत्तात्रय गुंजाळ (वय ५३), शिपाई गणपत भाऊ जावळे (वय ५०), नागेश शिवाजी पाटील (वय ४२), लिपिक मनोज आनंदा मोरबळे (वय ४०) आणि स्वप्निल रमेश तायडे (वय ४०) यांना अटक केली आहे. या प्रकरणात मंत्रालयातील महेश दुंपलवार आणि लावेश शंकर नकाते हे सध्या फरार आहेत. 

बॉम्ब धमकीमुळे प्रवेशाचे नियम कडक

विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच विधानभवनात बॉम्ब ठेवला असल्याची धमकी दिली गेली होती. हा मेल मिळाल्यानंतर सर्वत्र झाडाझडती घेण्यात आली. या प्रकरणानंतर विधानभवनात प्रवेश करण्याचे नियम अधिक कठोर करण्यात आले. 

याचदरम्यान, विधानभवनात प्रवेश करण्यासाठी बोगस पास विकले जात असल्याचा मुद्दा आमदारांकडून उपस्थित करण्यात आला. २००० ते ५००० रुपये घेऊन बनावट पास दिले जात असल्याचे समोर आले. काही शिपायांनी हे पास दिले असल्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते.

आमदार अमोल मिटकरी यांनीही प्रवेश पासबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. काही संघटनेचे कार्यकर्ते विधानभवनात दिसले. सभागृहातील एका दालनात जेवले, पूर्णवेळ पासेस मिळवल्या आणि काही पुस्तके वाटली. पासेस पूर्णपणे बंद असताना देखील हे प्रचारक आत कसे? असे मिटकरींनी म्हटले होते. त्यामुळे अधिवेशन काळात विकल्या जाणाऱ्या बोगस पासचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. 

Web Title : महाराष्ट्र विधानसभा फ़र्ज़ी पास घोटाला: पाँच गिरफ्तार, मंत्रालय कर्मचारी शामिल

Web Summary : महाराष्ट्र विधानसभा में फ़र्ज़ी पास से प्रवेश करने पर पाँच लोग गिरफ्तार। गिरफ्तार लोगों में मंत्रालय और विधानसभा के कर्मचारी शामिल हैं। बजट सत्र के दौरान फ़र्ज़ी पास बेचने का घोटाला सामने आया, बम की धमकी के बाद सुरक्षा चिंता बढ़ी।

Web Title : Maharashtra Assembly Fake Pass Scam: Five Arrested, Ministry Staff Involved

Web Summary : Five individuals were arrested for using fake passes to enter Maharashtra's Legislative Assembly. Those arrested include ministry and assembly employees. The scam involved selling bogus passes during the budget session, raising security concerns after a bomb threat.