Join us  

Video : खाकीतील कलाकाराचा डान्स पाहाल तर व्हाल थक्क; मुंबई पोलीस दलातला कमल हसन झाला व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 10:03 PM

Mumbai Police Amol Kamble Dance : अमोल कांबळे यांचा एकंदर डान्स करण्याचा अंदाज, चेहऱ्यावरील हावभाव आणि गाण्यातील ठेक्यावर थिरकणारे त्यांचे पाय पाहिले की नकळतच व्हिडीओ पाहणाऱ्यांच्याही चेहऱ्यावर स्मित येत आहे.

ठळक मुद्देआया है राजा, लोगो रे लोगो या गाण्याचा ठेका पकडून तरुणाईला आणि प्रशिक्षित डान्सर्सनाही लाजवेल असा डान्स हा पोलीस कलाकार करत आहेत.

मुंबई पोलीस दलातील एक कलाकार मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्याने आपल्या अफलातून नृत्य आविष्काराने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. आया है राजा, लोगो रे लोगो या गाण्याचा ठेका पकडून तरुणाईला आणि प्रशिक्षित डान्सर्सनाही लाजवेल असा डान्स हा पोलीस कलाकार करत आहेत. अमोल कांबळे हे मुंबई पोलीस दलातील या स्टार डान्सरचं नाव आहे. अमोल कांबळे यांचा एकंदर डान्स करण्याचा अंदाज, चेहऱ्यावरील हावभाव आणि गाण्यातील ठेक्यावर थिरकणारे त्यांचे पाय पाहिले की नकळतच व्हिडीओ पाहणाऱ्यांच्याही चेहऱ्यावर स्मित येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांसोबतच या वर्तुळात नसणाऱ्यांसाठीही कुतूहलाचा विषय ठरतात. निमित्त ठरतात ती विविध माध्यमं. सध्या अशाच विविध माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांची चर्चा सर्वत्र सुरु आहे. आपल्या अफलातून नृत्यकौशल्यानं अमोल कांबळे सर्वांचीच मनं जिंकत आहेत. आया है राजा, लोगो रे लोगो या गाण्याचा ठेका पकडून तरुणाईला आणि प्रशिक्षित डान्सर्सनाही लाजवेल असा डान्स हे पोलीस करत आहेत. अमोल कांबळे हे मुंबई पोलीस दलातील या स्टार डान्सरचं नाव आहे. भल्या डान्स करणाऱ्यांचा आणि कलाकारांचा डान्सही अमोल कांबळे यांचा डान्सपुढे फिका ठरत आहे. त्यांचा एकंदर डान्स करण्याचा अंदाज, चेहऱ्यावरील हावभाव आणि गाण्यातील ठेक्यावर थिरकणारे त्यांचे पाय पाहिले की नकळतच व्हिडीओ पाहणाऱ्यांच्याही चेहऱ्यावर स्मित येत आहे. मात्र आपण ऐकलं की 24 तास ड्युटी करणाऱ्या पोलिसांवर मोठा कामाचा ताण असतो. मात्र कांबळे यांनी आपली डान्स करण्याची कला जोपासली आहे. 

पोलीस दलात खूप काम असतं. तरीही कांबळे हे ड्युटी सुटायची तेव्हा किंवा सुट्टीच्या दिवशी व्हिडीओ पोस्ट करायचे. पण, नंतर ते बंद झालं. नंतर त्यांना एका मित्राने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करायला सांगितलं. तेव्हा इन्स्टाग्रामवर जुनेच व्हिडीओ टाकण्यास सुरुवात त्यांनी केली. पुढे अशी वजनदार शरीरयष्टी असणारा माणूसही कशा प्रकारे अनोख्या अंदाजात या कलेचा आनंद घेतो याबाबचं नेटकऱ्यांचं कुतूहल वाढलं आणि व्हिडीओ गाजत गेले. तसेच त्यांचा घरामध्ये त्यांचा भाऊ फोल्क डान्स करतो, त्याच्याकडे पाहून मी लहानपणापासून हळूहळू शिकलो होतो आणि आता टिकटॉकवर बनवत होतो. त्यातच हे आया हे राजा गाण्यावर डान्स केलं आणि ते मोठ्या प्रमाणात गाजले सगळीकडे कौतूक होत आहे. त्यांचे घरचे देखील खुश आहेत.

 

 

 

टॅग्स :पोलिसमुंबईइन्स्टाग्रामसोशल व्हायरलनृत्य