VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्ममध्ये अडकली महिला, असा वाचला जीव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 15:28 IST2021-09-20T15:28:33+5:302021-09-20T15:28:40+5:30

मुंबईतील वसई रोड रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे.

VIDEO: A woman got stuck under a train while boarding a speeding train in mumbai vasai station | VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्ममध्ये अडकली महिला, असा वाचला जीव...

VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्ममध्ये अडकली महिला, असा वाचला जीव...

मुंबई:मुंबईच्या वसई रोड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सतर्कतेमुळे एका महिलेचा थोडक्यात जीव वाचला आहे. रविवारी एक महिला वसई रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. या दरम्यान महिलेचा पाय घसरला आणि ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये अडकली. पण, घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने महिलेला बाहेर खेचले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलेचे फुटेज वृत्तसंस्था एएनआयने शेअर केले आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, धावत्या ट्रेनमध्ये महिला चढण्याचा प्रयत्न करत आहे. पण, यावेळी तोल जाऊन ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकते. यावेळी प्रसंगावधान साधून काही लोक तात्काळ महिलेला बाहेर खेचतात. घटना घडताच काही पोलिसही महिलेच्या मदतीसाठी येताना दिसत आहेत. यानंतर काही सेकंदातच ट्रेन थांबते आणि स्टेशनवर गर्दी होऊ लागते. हा व्हिडिओ व्हायरल होताच, त्या महिलेला वाचवणाऱ्या लोकांचे कौतुक होत आहे.
 

Web Title: VIDEO: A woman got stuck under a train while boarding a speeding train in mumbai vasai station