Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: तुझ्या गल्लीत पेशंट घावलाय व्हय?, रितेशने शेअर केला मजेशीर व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 16:00 IST

रितेश हा बॉलिवूडमध्ये काम करत असला तरी तो मराठीशी त्याची जुळलेली नाळ नेहमीच पाहायला मिळते. त्यामुळे, मराठी सिनेमातही त्याने आवर्जुन काम केलंय

ठळक मुद्देरितेश हा बॉलिवूडमध्ये काम करत असला तरी तो मराठीशी त्याची जुळलेली नाळ नेहमीच पाहायला मिळते. त्यामुळे, मराठी सिनेमातही त्याने आवर्जुन काम केलंय

मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भाव जगभर मोठ्या प्रमाणात झाल्याने, चीनच्या वुहान शहरातून आलेला हा कोरोना आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही पसरला आहे. कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून संबंधित क्षेत्र प्रतिबंधित केला जातो. त्यामुळे, सगळीकडे त्याचीच चर्चा होते. तर, लॉकडाऊन, कोरोना, क्वारंटाईन हे शब्दही आता रोजच्या जगण्याचा भाग झालाय. यावरुन अनेक मिम्स तयार केले जातात, तर व्हिडिओही शेअर होतात. अभिनेता रितेशन देशमुखने असाच एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. 

रितेश हा बॉलिवूडमध्ये काम करत असला तरी तो मराठीशी त्याची जुळलेली नाळ नेहमीच पाहायला मिळते. त्यामुळे, मराठी सिनेमातही त्याने आवर्जुन काम केलंय. तर, सोशल मीडियातूनही तो सातत्याने काही ना काही शेअर करत असतो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातही कोरोनाचीच चर्चा असल्याचे दिसून येते. कोरोनामुळे कुठे रुग्णांची अव्हेलना होतेय, तर कुठे रुग्णांना पाठबळ दिल जातयं. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही कोरोनावरुन भीती अन् गंमत पाहायला मिळत आहे. तर, कुठे वादही झाल्याचा घटना घडत आहेत. रितेशने असाच एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. 

रितेशने मराठी ह्युमर हे कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर केला आहे. या लय भारी व्हिडिओला नेटीझन्सने चांगलाच प्रतिसाद दिल्याचं दिसून येतंय.  

टॅग्स :रितेश देशमुखकोरोना वायरस बातम्याट्विटर