Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: संजय राऊतांची पत्रकार परिषद सुरू असतानाच निघाला मोठा साप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 11:51 IST

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरात अचाकन साप निघाल्याने सर्वांचीच धावपळ झाली. राऊत हे नेहमीप्रमाणे पत्रकार ...

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरात अचाकन साप निघाल्याने सर्वांचीच धावपळ झाली. राऊत हे नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेत होते. त्याचवेळी, सकाळच्या सुमारास ही  साप निघाल्याची घटना घडली.  

खासदार संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद सुरू असतानाच अगदी त्यांच्या खुर्चीच्या जवळच एक साप आल्याची घटना घडली. पांदीवड प्रकारचा हा बिनविषारी साप होता, पण साप निघाल्यामुळे लवकरच पत्रकार परिषद आटोपण्यात आली. त्यानंतर, सर्पमित्राला बोलावून हा साप पकडण्यात आला. सर्पमित्राने बॅगमध्ये घालून साप नेला. मात्र, या घनटेची पत्रकारांमध्ये आणि त्यानंतर माध्यमांत चांगलीच चर्चा रंगली.

टॅग्स :संजय राऊतसापमुंबईशिवसेना