Join us  

Video : 'हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हे  युद्ध आपण जिंकणारचं', हम होंगे कामयाब...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 2:57 PM

राज्यात आणि देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे, त्यामुळे जनतेला घरातच बसावे लागत आहे.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून एक व्हिडीओ प्रसारीत करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटात लढणाऱ्या राज्यातील प्रत्येक नागरिकाला हा व्हिडीओ समर्पित करण्यात आला आहे. घरात बसून आपणही कोरोनाच्या लढाईत आपलं योगदान देत आहोत. आपणही कोरोनाविरुद्ध लढाईतील सैन्य आहोत, असं सांगणारा हा व्हिडिओ आहे. संकट गंभीर पण सरकार खंबीर असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या व्हिडीओतून म्हटले आहे. साधारण २ मिनिटांचा हा व्हिडिओ पॉवरफुल आणि सकारात्मक संदेश राज्यातील जनेतला देतो. 

राज्यात आणि देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे, त्यामुळे जनतेला घरातच बसावे लागत आहे. आता, या संकटाचा सामना प्रत्येकजण करत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थिती दाखवत ही लढाई आपण जिंकणार, आपण कामयाब होणार... असा संदेश मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंनी दिला आहे. 

'गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जग व्हायरसविरुद्ध लढत आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य हेच या युद्धात आपली ताकद आहे, हे आपल्या सरकारचं बळ आहे. आपण सर्वांनी एकजुटीनं याचा सामना केल्यास हे संकट आपलं काहीही वाकड करु शकणार नाही. सध्या या लढाईत लढणाऱ्या प्रत्येकाची बराबरी जवानांसोबत केली आहे, या यंत्रणांवरचा भार कमी करणं हे आपलं काम आहे. या संदेशासोबत हम होंगे कामयाब एक दिन.... हो हो.. मन मे है विश्वास... पूरा है विश्वास... हम होंगे कामयाब एक दिन.... असं गाण ऐकूवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक सकारात्मक संदेश महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला दिला आहे. तसेच, हा व्हिडीओ महाराष्ट्रातील सर्व जनतेला समर्पित' करत असल्याचेही या व्हिडिओत म्हटले आहे. 

हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हे युद्ध आपण गनिमी काव्यानं जिंकायंचय अन् आपण हे युद्ध जिंकणारचं. संकट गंभीर आहे, पण सरकार खंबीर आहे, असेही संबोधन या व्हिडिओतून करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळा देश बंद आहे. महाराष्ट्रातली मुंबई, कोल्हापूर आणि इतर महत्त्वाची ठिकाणं लॉकडाउनमुळे कशी शांत झाली आहेत हे दाखवण्यात आलं आहे. त्यासोबत करोनाच्या लढाईत नेटाने लढा देणारे लढवय्ये… म्हणजे पोलस, डॉक्टर्स, नर्सेस आणि अत्यावश्यक सेवेत झटणारे हात या व्हिडीओतून दिसून येत आहेत. आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सकारात्मकता.

 

 

 

टॅग्स :उद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्र