Video : सोनम-आनंदचा संगीत सोहळ्यात डान्स फ्लोअरवर धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 09:53 IST2018-05-08T09:46:27+5:302018-05-08T09:53:26+5:30

बॉलिवूडची 'मसकली गर्ल' सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत आज विवाहबंधनात अडकणार आहे.

Video: sonam kapoor anand ahuja's dance in sangeet | Video : सोनम-आनंदचा संगीत सोहळ्यात डान्स फ्लोअरवर धमाका

Video : सोनम-आनंदचा संगीत सोहळ्यात डान्स फ्लोअरवर धमाका

मुंबई - बॉलिवूडची 'मसकली गर्ल' सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत आज विवाहबंधनात अडकणार आहे. सोमवारी (8 मे) सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला. मुंबईतील सनटेक BKC मध्ये हा संगीत सोहळा जल्लोषात पार पडला. संगीत सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. 

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, राणी मुखर्जी, जॅकलीन फर्नांडिस, शिल्पा शेट्टी, करण जोहर अन्य सर्वांनी या सोहळ्याला हजेरी लावली आणि धम्माल केली. संगीत सोहळ्यासाठी ड्रेस कोडदेखील ठेवण्यात आला होता. संगीत सोहळ्यात सोनमनं नवरदेव आनंद आहुजासोबत ताल धरला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनीही संगीत समारंभात दमदार डान्स केला.

सोनमच्या काकी कविता सिंह यांच्या घरी सोनम आणि आनंद आहुजा यांचा विवाह सोहळा होणार आहे. बंगल्यातील मंदिरात सकाळी 11 ते 12.30 या वेळेत लग्नाच्या विधि पार पडणार आहेत.

 

Web Title: Video: sonam kapoor anand ahuja's dance in sangeet