बालिकेवरील लैंगिक अत्याचाराच्या दिवशीचे व्हिडीओ रेकाॅर्डिंगच गायब! मालाडच्या शाळेकडे केवळ १५ दिवसांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:48 IST2026-02-20T12:48:13+5:302026-02-20T12:48:47+5:30

शिक्षणाधिकाऱ्यांच्या निरीक्षणात उघड

Video recording of the day of sexual assault on a girl missing! Malad school has only 15 days of CCTV recording | बालिकेवरील लैंगिक अत्याचाराच्या दिवशीचे व्हिडीओ रेकाॅर्डिंगच गायब! मालाडच्या शाळेकडे केवळ १५ दिवसांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग

बालिकेवरील लैंगिक अत्याचाराच्या दिवशीचे व्हिडीओ रेकाॅर्डिंगच गायब! मालाडच्या शाळेकडे केवळ १५ दिवसांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग

घन:श्याम सोनार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालाडमधील एका शाळेत पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना गेल्याच महिन्यात उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी शिपायाला अटकही झाली आहे. मात्र, याबाबतचा पुरावाच शाळेकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शाळेकडे केवळ १५ दिवसांचेच डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. घटना घडल्याच्या दिवसाचे रेकॉर्डिंग नाही, असे शिक्षण अधिकाऱ्यांच्या निरीक्षणात आढळले. त्यामुळे शाळांमधील डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे.

जानेवारीत घडलेल्या या प्रकरणात तक्रार उशिरा नोंदवणे तसेच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार करू नये, म्हणून शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने दबाव टाकल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार १२ जानेवारीला आरोपीने मुलीशी गैरवर्तन करत याबाबत कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे. मुलीने आईला घटना सांगितल्यानंतर पालकांनी शाळेकडे तक्रार केली; मात्र शाळेकडून त्वरित कारवाई झाली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४ व ३५१ (२) तसेच पोक्सो कायदा २०१२ मधील कलम १०, १७ आणि २१ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. शिक्षण आयुक्तांच्या स्तरावर तीन दिवसांपूर्वी व्हर्च्युअल बैठकीत राज्यातील शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.  सुरक्षाविषयक कोणतीही तडजोड न करण्याच्या सूचना देण्यासह सर्व शाळांना किमान ३० दिवसांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ठेवण्याच्या सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

पुरावे मिळविण्यात अडचणी

संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असून, शाळेतील व्हिडीओ रेकॉर्डिंग केवळ १५ दिवसांचे असल्यामुळे पुरावे मिळविण्यात अडचणी येत असल्याची माहिती संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिल्याचे पश्चिम विभागाचे शिक्षण निरीक्षक संजय जावीर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. येत्या दोन दिवसांत पुन्हा शाळेला भेट देणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शाळांमध्ये केवळ पंधरा दिवसांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग असल्यास त्याची चौकशी केली जाईल. बालकांच्या सुरक्षेसाठी अधिक कालावधीसाठी रेकॉर्डिंग ठेवण्याच्या सूचना दिल्या जातील.

सचिंद्र प्रताप सिंह, आयुक्त, शिक्षण विभाग

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मानसिक खंबीरपणे उभे राहण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात पालक-शिक्षक समितीत नियमित चर्चा झाली पाहिजे.

जयवंत कुलकर्णी, ज्येष्ठ समुपदेशक

Web Title : मालाड स्कूल में बाल यौन शोषण के बाद सीसीटीवी फुटेज गायब

Web Summary : मालाड के एक स्कूल में बाल यौन शोषण की घटना के दिन का महत्वपूर्ण सीसीटीवी फुटेज गायब है। स्कूल केवल 15 दिनों का रिकॉर्डिंग रखता है, जिससे पुलिस जांच में बाधा आ रही है। अधिकारी चूक की जांच कर रहे हैं और छात्र सुरक्षा के लिए लंबे समय तक सीसीटीवी रिकॉर्डिंग रखने की आवश्यकता पर जोर दे रहे हैं।

Web Title : Malad School's CCTV Footage Missing After Child Sex Abuse Incident

Web Summary : Crucial CCTV footage from the day of a child's sexual assault in a Malad school is missing. The school only keeps 15 days of recordings, hindering the police investigation. Officials are investigating the lapse and emphasizing the need for longer CCTV retention for student safety.