Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: अरे देवा, हा तर वेगळाच मसाज झाला! केस धरले, बेडवर फेकलं आणि बघा काय घडलं? मुंबईत कुठे घडली घटना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 19:51 IST

Masseuse Attack Mumbai Video: महिलेने घरीच मसाज करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग केली. मसाज करणारी महिला घरी आली. पण, काही गोष्टींमुळे महिलेने बुकिंग रद्द केली आणि घरातच दे दणा दण सुरू झाली. 

Mumbai Masseuse Attack Video: घरीच मालिश करण्यासाठी एका ४६ वर्षीय महिलेने ऑनलाईन बुकिंग केली. मसाज करणारी महिला घरी आली. पण, महिलेने ऐन वेळी बुकिंग रद्द केली. त्यावरून वाद इतका वाढला की दोन्ही महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. मुंबईतील वडाळा भागात ही घटना घडली. 

वडाळा भागात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दोन्ही महिला सुरूवातीला शा‍ब्दिक हुज्जत घालताना दिसत आहेत. त्यानंतर हा वाद इतका वाढला की थेट बेडपर्यंत जाऊन पोहोचला. 

वडाळा पूर्वमध्ये राहणाऱ्या ४६ वर्षीय महिलेने अर्बन कंपनीची मसाज सर्व्हिस ऑनलाईन बुक केली होती. प्रायव्हसी आणि सामानाच्या कारणावरून महिलेने बुकिंग रद्द केली. त्यानंतर हा वाद सुरू झाला. 

महिला आणि मसाजरची मारहाण, व्हिडीओ व्हायरल

मसाजर महिला तक्रारदार महिलेच्या घरातील बेडरुममध्ये उभी राहून मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करत असल्याचे दिसत आहे. दोघींमध्ये शा‍ब्दिक वाद करत होत्या. तक्रारदार महिलेने मसाज करणाऱ्या महिलेला घराच्या बाहेर पडण्यास सांगितले. 

घरात उभी राहून वाद घालू नको, असे तक्रारदार महिला त्या मसाज करणाऱ्या महिलांना म्हणते. तक्रारदार महिला तिची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर दोघींमध्ये हाणामारी सुरू होते.

 

केसाच्या झिंज्या, बेडवर नेऊन फेकले

दोघींमधील वाद इतका वाढला की, मसाज करायला आलेल्या महिलेने तक्रारदार महिलेला तिच्याच घरात केस धरून मारहाण केली. बेडवर फेकले. त्यानंतर दोघी एकमेकींना बेदम मारहाण करतात. 

दोघी मारहाण करत असताना तक्रारदार महिलेच्या मुलाने याचा व्हिडीओ शूट केला. ही एक महिला आमच्या घरात शिरली. माझ्या आईला मारहाण करत आहे. पोलिसांना फोन करेन, तुझे करिअर संपवेन, असे तो मुलगा म्हणताना ऐकू येत आहे. 

पोलीस ठाण्यात तक्रार, महिलेला नोकरीवरून काढले

या प्रकरणी महिलेने मसाज करायला आलेल्या महिलेविरोधात वडाळा टीटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. दरम्यान, अर्बन कंपनीने सदरील महिलेला नोकरीवरून काढून टाकले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Massage booking turns violent, woman assaulted in Wadala home.

Web Summary : A Mumbai woman's online massage booking turned violent after she canceled it due to privacy concerns. The masseuse allegedly assaulted her, leading to a physical altercation in her Wadala home. Police complaint filed; the masseuse was fired.
टॅग्स :सोशल व्हायरलव्हायरल व्हिडिओमुंबईगुन्हेगारी