Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: राज ठाकरे पुन्हा टेनिस कोर्टवर! शिवाजी पार्क जिमखान्यावर जबरदस्त 'टोले'बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 08:56 IST

राज ठाकरे यांनी कोरोना काळात शिवाजी पार्कवर स्वत:ला फिट ठेवण्यासाठी टेनिसची प्रॅक्टीस केली होती.

राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्यात टेनिस कोर्टवर सामना रंगल्याचे आपण तीन वर्षांपूर्वी पाहिले होते. आता पुन्हा राज ठाकरेटेनिसच्या मैदानात उतरले आहेत. आज पहाटे राज यांनी शिवाजी पार्कवर कसून सराव केला. 

याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. राज ठाकरेंनी कला आणि क्रीडा याबाबत आवड सर्वांना माहिती आहे. आता राजकारणाच्या पिचवर टोल्यांवर टोले हाणणाऱ्या राज ठाकरेंनी टेनिसच्या पिचवरही जबरदस्त फटके हाणले आहेत. 

राज ठाकरे यांनी कोरोना काळात शिवाजी पार्कवर स्वत:ला फिट ठेवण्यासाठी टेनिसची प्रॅक्टीस केली होती. ते दररोज खेळण्यासाठी जात होते. यासाठी त्यांनी प्रशिक्षकही नेमला होता. 

जानेवारी 2021 मध्ये टेनिस खेळताना राज यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यांच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याची माहिती तेव्हा समोर आली होती. त्यानंतर पक्षाच्या बैठकीवेळीही राज ठाकरे उपस्थित असताना हाताला प्लास्टर केलेलं असल्याचं दिसून आलं होतं. आता पुन्हा एकदा राज हे राजकीय कोर्टसह टेनिस कोर्टवर उतरल्याने भल्याभल्यांची दाणादाण उडणार हे नक्की आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेटेनिस