Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : मुंबईच्या रस्त्यावर हायप्रोफाईल ड्रामा; तिनं नवऱ्याला दुुसऱ्या स्त्रीसोबत पाहिलं, गाडीबाहेर खेचून मारलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 18:01 IST

वाहतुकीचा खोळंबा केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी पांढऱ्या रंगाच्या क्रेटा आणि काळ्या गाडीवर कारवाई केली. गावदेवी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

ठळक मुद्देपतीला दुसऱ्या स्त्रीसोबत पाहिल्यानंतर पत्नीने भर रस्त्यातच गाडीच्या काचा खाली खेचण्याचा प्रयत्न केला आणि गादीवर चढून काचेवर जोडे मारले. मोटर वाहतूक अधिनियम १२२(रस्त्यावर अडथळा निर्माण करुन वाहतुकीचा खोळंबा करणे) अन्वये ई-चलान पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

मुंबईमुंबईत भररस्त्यात ट्रॅफिकमध्ये पत्नीचा हंगामा पाहायला मिळाला. आपल्या पतीला दुसऱ्या स्त्रीसोबत पाहिल्यानंतर पत्नीने भररस्त्याच वाहतूक पोलिसांसमोर हंगामा केला. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हाजी अलीपासून काही मीटर अंतरावरील पेडर रोडजवळील पेट्रोल पंप परिसरात हा सर्व प्रकार घडला. वाहतुकीचा खोळंबा केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी पांढऱ्या रंगाच्या क्रेटा आणि काळ्या गाडीवर कारवाई केली. गावदेवी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिडीओत ती महिला, तिचा पती आणि त्याची गर्लफ्रेंड दिसत आहे. पतीला दुसऱ्या स्त्रीसोबत पाहिल्यानंतर पत्नीने भर रस्त्यातच गाडीच्या काचा खाली खेचण्याचा प्रयत्न केला आणि गादीवर चढून काचेवर जोडे मारले. रस्त्यातच गाडी अडवत ती गाडीच्या बोनेटवर चढत तिने हायप्रोफाईल ड्रामा केला. नंतर पतीला गाडीबाहेर खेचून मारहाण केली.  या सर्व घटनेनंतर गावदेवी पोलिसांनी त्या महिलेची विचारपूसही केली. मात्र, तिने पतीविरोधात काहीही तक्रार केलेली नाही. मात्र, त्या दोन्ही गाड्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. यातील पांढऱ्या रंगाच्या गाडीवर शनिवारी कारवाई करण्यात आली आहे. मोटर वाहतूक अधिनियम १२२(रस्त्यावर अडथळा निर्माण करुन वाहतुकीचा खोळंबा करणे) अन्वये ई-चलान पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

 

टॅग्स :वाहतूक पोलीसवाहतूक कोंडीमुंबई