रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 18:45 IST2025-04-29T18:44:14+5:302025-04-29T18:45:44+5:30

Mumbai Local Train Motorman Retirment Video: मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या सहकाऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने निरोप दिला.

VIDEO: Heartwarming Farewell For Mumbai Local Train Motorman At CSMT Station Goes Viral | रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!

रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!

मुंबईतीलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यात रेल्वेतील कर्मचारी सेवेतून निवृत्त झालेल्या एका मोटरमनला खास अंदाजात निरोप देताना दिसत आहेत. हे पाहण्यासाठी प्रवाशांनी सीएसएमटी स्थानकावर प्रचंड गर्दी केली. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सेवेतून निवृत्त झालेला मोटरमन आपल्या सहकाऱ्यांसोबत नाचत आहे. अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीचा निरोप समारंभ पाहण्यासाठी मुंबईकरांनी सीएसएमटी स्थानकावर गर्दी केल्याची दिसत आहे. हा व्हिडिओ tag_mumbai या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिली आहे की, 'मध्य रेल्वे लोकल ट्रेनचा मोटरमन दीर्घ प्रवासानंतर निवृत्त झाला.  मुंबईकरांनी त्याच्या सेवेतील शेवटचा प्रवास साजरा केला. त्याच्यामुळे लोक वेळत पोहोचले. त्याच्या सेवेबद्दल धन्यवाद.'


या व्हिडिओला अनेक लाईक्स मिळाल्या आहेत. तर, अनेकांनी भावनिक कमेंट केल्या आहेत. लोकांनी मोटरमनच्या सेवेबद्दल त्याचे आभार मानले आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ कठोर परिश्रम करणाऱ्यांबद्दल मुंबईकरांना असलेले प्रेम आणि आदर हे दर्शवत आहे. 

Web Title: VIDEO: Heartwarming Farewell For Mumbai Local Train Motorman At CSMT Station Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.