Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : हॅट्स ऑफ टू मुंबई पोलीस; रक्त देऊन 'त्या' योद्ध्याने वाचवला चिमुकलीचा जीव

By पूनम अपराज | Updated: June 4, 2020 20:30 IST

मुंबईत कोरोनाचे संकट असो, वादळाचे संकट असो आणि अन्य कोणत्याही संकटसमयी पोलीस हे देवदूत बनून मदतीला येतात.

ठळक मुद्देताडदेव पोलिस स्टेशनचे ऑन ड्युटी  पोलीस आकाश बाबासाहेब गायकवाड यांनी फक्त माणुसकी हाच आपला धर्म समजून आणि पोलीस ब्रीदवाक्य सद्रक्षणाय यास अनुसरून तिच्यासाठी अशा संकटप्रसंगी धावून आले.या संपूर्ण पोलीस कुटुंबाचा प्रमुख म्हणून मला आपल्या पोलीस दलाचा अभिमान आहे. अशा शब्दात गृहमंत्र्यांनी आकाशचा गौरव केला.

पूनम अपराजमुंबई - हिंदुजा रुग्णालयात १४ वर्षांच्या सना फातिम खान हिला काल अचानक ओपन हार्ट सर्जरीवेळी A+ रक्त तातडीने लागले. मुंबईमध्ये भयंकर चक्रीवादळ व कोरोनामुळे रक्त देण्याकरिता तिच्या कुटुंबातील आणि नातेवाईक कोणीही रुग्णालयात येऊ शकले नाही. अशा गंभीर परिस्तिथीत ऑन ड्युटी असलेले पोलीस शिपाई आकाश बाबासो गायकवाड यांनी काहीही विचार न करता चिमुकलीचा रक्तदान केले. हा योद्धा इतक्या बेताच्या परिस्थितीत फक्त माणुसकी हाच आपला धर्म म्हणून चिमुकलीच्या संकटकाळी वेळीच धाऊन आला आणि रक्तदान करून या मुलीला जीवनदान दिले. यातून पुन्हा सिद्ध झाले संकट कोणतेही असो पोलीस हे देव बनून साक्षात मदतीला धावून येतात.

मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश गायकवाड यांनी काल ओपन हार्ट सर्जरी होणाऱ्या एका छोट्या मुलीला स्वतःचे रक्त देऊन माणुसकीचे नाते जपले, त्याबद्दल खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी "आकाश तुझा आम्हाला अभिमान आहे" अशा शब्दात त्याचे फोन करून विशेष अभिनंदन केले. काल ३ जूनला हिंदुजा रुग्णालय येथे १४ वर्षांच्या सना फातिम खान या छोट्या मुलीला अचानक ओपन हार्ट सर्जरी वेळी A+ रक्त लागणार होते. तसेच मुंबईमध्ये निसर्ग चक्रीवादळ आणि कोरोनामुळे रक्त देण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य असे कोणीही रुग्णालयात येऊ शकले नाहीत. अशा गंभीर परिस्थितीत दवाखान्यात नेमणुकीस असलेले ताडदेव पोलिस स्टेशनचे ऑन ड्युटी  पोलीस आकाश बाबासाहेब गायकवाड यांनी फक्त माणुसकी हाच आपला धर्म समजून आणि पोलीस ब्रीदवाक्य सद्रक्षणाय यास अनुसरून तिच्यासाठी अशा संकटप्रसंगी धावून आले. आपले रक्तदान करून या मुलीला जीवनदान दिले. 

मुंबईत कोरोनाचे संकट असो, वादळाचे संकट असो आणि अन्य कोणत्याही संकटसमयी पोलीस हे देवदूत बनून मदतीला येतात. हे यातून पुन्हा सिद्ध झाले. सर्वसामान्य नागरिकांसाठी पोलीस दलाचा कायमच भक्कम आधार आहे. आकाश गायकवाड यांच्यासारख्या योद्ध्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे सलाम ठोकला आहे. तसेच या संपूर्ण पोलीस कुटुंबाचा प्रमुख म्हणून मला आपल्या पोलीस दलाचा अभिमान आहे. अशा शब्दात गृहमंत्र्यांनी आकाशचा गौरव केला.

 

Kerala Elephant Death : आरोपींची धरपकड सुरु, एका संशयित व्यक्तीची केली चौकशी 

 

दोन्ही प्रियकर एकाच वेळी प्रेयसीच्या घरात अन् काही तासातच एकाची हत्या 

टॅग्स :पोलिसमुंबईहॉस्पिटलअनिल देशमुख