Join us  

Video: हस्तांदोलन, दिलखुलास हास्य अन् पाठीवर थाप; नरेंद्र मोदी-शरद पवारांची 'ग्रेट भेट'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 12:42 PM

नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाराचा आरोप केला होता, त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीला भाजपसोबत सत्तेत सहभागी करून घेतले.

मुंबई - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येणार असल्याने राज्यातील राजकीय वर्तुळाच दोन दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यात, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याने लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याकडे देशाचे लक्ष लागले आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदींनी पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर येतात मान्यवरांना हात जोडून नमस्कार केला. मात्र, यावेळी, मोदींनी शरद पवारांसमोर येताच त्यांच्या हातात हात दिला. शरद पवारांनीही स्मीतहास्य करत मोदींची पाठ थोपटली. 

नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाराचा आरोप केला होता, त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीला भाजपसोबत सत्तेत सहभागी करून घेतले. मात्र, शरद पवारांनी आपला भाजपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले. पण, आज पुण्यातील या पुरस्कार सोहळ्यात मोदींसमवेत व्यासपीठावर एकत्र आल्याने विरोधी पक्षाच्या राजकीय वर्तुळात आणि इंडिया आघाडीतही काहीशी नाराजी असल्याची चर्चा होती. शिवसेनेच्या संजय राऊत यांनीही उघडपणे ही नाराजी बोलून दाखवली होती. आता, कार्यक्रमाच्या निमित्ताने मोदी-पवार यांची व्यासपीठावर भेट झाली. या भेटीवेळी मोदी आणि शरद पवार यांच्यात अल्पसा पण मजेशीर संवाद झाल्याचं दिसून आलं. कारण, मोदींनी काहीतरी बोलल्यानंतर शरद पवारांनी हसून दाद दिली. तसेच, मोदींचा हात हातात घेत त्यांची पाठही थोपटली. 

मोदी-पवार भेटीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्या व्हिडिओत शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात थोडासाच, पण दिलखुलास संवाद झाल्याचं दिसून येत आहे. तसेच, शरद पवारांनी मोदींचा हात हाती घेऊन, त्यांची पाठही थोपटल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओची सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा होत आहे. 

टॅग्स :शरद पवारनरेंद्र मोदीपुणेसोशल व्हायरल