Join us

Video: विधानसभेत फडणवीसांचं भाषण, महाजनांना डुलकी अन् शेलारांचे हातवारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 23:14 IST

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महत्त्वाच्या विषयावर सभागृहात गंभीर चर्चा करत असताना, भाजप नेते गिरीश महाजन यांना डोळा लागला

मुंबई - राज्याच्या विधानभवनात किंवा देशाच्या संसद भवनात अनेकदा नेतेमंडळी, संबंधित सभागृहाचे सदस्य हे चर्चासत्रादरम्यान डुलकी घेतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असता. त्यामध्ये, अनेकदा त्यांचे विचित्र हावभावही कॅमेऱ्यात कैद होतात. एखाद्या बोअरींग लेक्चरला विद्यार्थ्यांना जशी क्लासमध्ये झोप लागते. त्याप्रमाणे या सभागृहातही अनेकदा अशा घटना घडतात. आता, राज्याचे माजी मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांना डुलकी लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महत्त्वाच्या विषयावर सभागृहात गंभीर चर्चा करत असताना, भाजप नेते गिरीश महाजन यांना डोळा लागला, मग ते मस्त डुलकी घ्यायला लागले. त्याचवेळी, त्यांच्याच बाकावर शेजारी बसलेल्या आमदार आशिष शेलार यांनी कोपऱ्याने डिवचले. मग, झोपेतून जाग आल्यानंतर जसं होतं, तसंच महाजन यांच्याही बाबतीत झाल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. 

देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासंदर्भातील विषयावर बोलत असताना हा प्रकार घडला आहे. संबंधित पदाधिकारी हे त्या ठिकाणी गोळीबार करतात.. असे म्हणता पाठिमागून भाजपचे आशिष शेलार सभापतींच्या खुर्चीकडे हात करून काहीतरी बोलतात. त्याचवेळी, ते गिरीश महाजन यांना खुनावणात, मग गिरीश महाजन लगेचच आपला हात वर करत शेलारांच्या हो मध्ये हो.. मिसळतात, असे या व्हिडिओतील घटनेतून दिसून येत आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसविधान भवनगिरीश महाजन