VIDEO Even big hospitals in Mumbai do not have beds coronavirus Treatment in the lobby harsh goenka | VIDEO: मुंबईतील बड्या रुग्णालयातही बेड्स नाहीत; रुग्णांवर लिफ्टच्या लॉबीत उपचार

VIDEO: मुंबईतील बड्या रुग्णालयातही बेड्स नाहीत; रुग्णांवर लिफ्टच्या लॉबीत उपचार

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढमुख्यमंत्र्यांचे लॉकडाऊनचे संकेत

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि राज्यातील कोरोबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येताना दिसत आहे. मुंबईसारख्या शहरातीलही आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आल्याचं दिसत आहे. मुंबईतील काही रुग्णालयांमध्ये बेड्सही शिल्लक नसल्याचं चित्र आहे. दरम्यान, उद्योजक हर्ष गोयंका यांनी हे भयाण वास्तव दाखवणारा मुंबईतील एका बड्या हॉस्पीटलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

हर्ष गोयंका यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. रुग्णालयात बेड्स उपलब्ध नसल्यानं रुग्णांना लिफ्टच्या लॉबीमध्ये बेड्स देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ मुंबईतील एका बड्या रुग्णालयाचा असल्याची माहिती गोयंका यांनी दिली. "रुग्णालये भरली आहेत. आवश्यक औषधांचाही तुटवडा आहे. लसी उपलब्ध नाहीत. मुंबईतील परिस्थिती गंभीर आहे," असं त्यांनी व्हिडीओसह नमूद केलं आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, लिफ्टने ये-जा करण्यासाठी असलेल्या जागेतही बेड्स ठेवून रुग्णांवर उपचार केले जात असल्याचं यात दिसून येक आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज १० हजारांच्या जवळ रुग्णांची नोंद होत आहे. याशिवाय राज्यातील काही प्रमुख शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. मुंबत आतापर्यंतच्या आकडेवाडीनुसार ९० हजारांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसंच रुग्ण बरे होण्याचा दरही आता ७९ टक्क्यांवर आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३४ दिवसांवर आला आहे.

अनर्थचक्र थांबवायचे तर निर्बंध अपरिहार्य : मुख्यमंत्री

तुम्ही त्याला लॉकडाऊन म्हणा की आणखी काही, पण कोरोनाने जे अनर्थचक्र राज्यावर ओढवले आहे. ते थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध लावावेच लागतील, या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत कडक लॉकडाऊनचे संकेत दिले होते. कडक लॉकडाऊन आठ दिवसांचा असेल आणि नंतर गरजेनुसार तो एक आठवडा वाढविला जावा किंवा सुरुवातीलाच १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करावा, असे दोन पर्याय सध्या आहेत. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: VIDEO Even big hospitals in Mumbai do not have beds coronavirus Treatment in the lobby harsh goenka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.