Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : मुलुंड येथे सिलिंडरचा स्फोटामुळे आग; दोन महिला जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 16:57 IST

सुदैवाने सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत जीवितहानी झालेली नाही.  

मुंबई - मुलुंड पूर्वेकडे असलेल्या नवघर गल्ली १ मधील झोपडपट्टीत २ सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. कॅम्पस हॉटेलनजीक असलेल्या झोपडपट्टीत हा सिलिंडर स्फोट झाला होता. अग्निशमन दलाचे पथक माहिती मिळताच घटनास्थळी रवाना झाले.  सुदैवाने सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत जीवितहानी झालेली नाही. मात्र, दोन महिला जखमी झाल्या असून त्यांना वीर सावरकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. शेवंता फडके (७१) आणि लक्ष्मी अशोक कुमारी (३०)  अशी या जखमी महिलांची नावे आहेत. 

टॅग्स :आगपुणे अग्निशामक दल