Join us

विदर्भ, मराठवाड्याला प्रलंबित कृषीपंप जोडणीसाठी 200 कोटी मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 17:23 IST

ऊर्जा विभागाच्या 2291 कोटींच्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत मंजूर केल्या. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान सभेत या मागण्या मांडून त्या मंजूर करण्याची सभागृहाला विनंती केली.

मुंबई - ऊर्जा विभागाच्या 2291 कोटींच्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत मंजूर केल्या. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान सभेत या मागण्या मांडून त्या मंजूर करण्याची सभागृहाला विनंती केली.

महानिर्मितीच्या कोराडी प्रकल्प संच क्रमांक 6 करिता 2018-19 साठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली. या तरतुदीपैकी जागतिक बैंकेकडून महानिर्मितीला जगतिक बैंकेकडून प्राप्त झालेल्या 22 कोटींच्या अनुदान समायोजनासाठी 22 कोटींची पुरवणी मंजूर करण्यात आली.

विदर्भ, मराठवाडा विभागातील प्रलंबित कृषी पंपाना वीज जोडणी देण्यासाठी कंत्राटदारांना साधन सामुग्री खरेदी व उभारणीच्या कमासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता लक्षात घेता 499 कोटींपैकी 200 कोटी रूपयांना सभागृहाने मंजुरी दिली.

महावितरण कंपनीने सन 2018-19 साठी 11336 कोटींची मागणी सादर केली होती. सन 2018-19 साठी अर्थसंकल्पीय तरतूद 4941 कोटींची मागणी मंजूर केली. तसेच महानिर्मितीच्या कोराडी प्रकल्पातील संच क्रमांक 6 साठी सन 2018-19 करिता 30 कोटींची तरतूद करण्यात आली. यापैकी जागतिक बैंकेकडून महानिर्मितीला परस्पर 14.14 कोटी कर्ज प्राप्त झाले. या रकमेच्या समायोजनासाठी 69 कोटीची पुरवणीमागणी मंजूर करण्यात आली.

टॅग्स :महाराष्ट्र सरकार