ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती शनिवारी बिघडली. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने तातडीने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही माहिती दिली गेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, आशा भोसले यांची शनिवारी ह्रदयविकाराचा झटका आल्याने प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने मुंबईती ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या emergency medical Services कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.
आशा भोसले यांच्या प्रकृतीबद्दल अधिकची माहिती मिळू शकली नाही. त्यांच्या कुटुंबीयांकडून किंवा रुग्णालयाकडूनही अद्याप माहिती दिली गेली नाही.
दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या धाकटी बहीण असलेल्या आशा भोसले यांनी आपल्या सूरांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे.
लहानपणीच संगीताचे बाळकडू मिळालेला आशा भोसले यांनी फक्त मराठी किंवा हिंदीच नाही, तर २० हून अधिक भाषांमध्ये ११,००० पेक्षा जास्त गाणी गाऊन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
Web Summary : Veteran singer Asha Bhosle experienced a heart attack Saturday. She was immediately admitted to Breach Candy Hospital in Mumbai, where treatment is underway. The hospital has yet to release any details regarding her condition.
Web Summary : दिग्गज गायिका आशा भोसले को शनिवार को दिल का दौरा पड़ा। उन्हें तुरंत मुंबई के ब्रीच कैंडी अस्पताल में भर्ती कराया गया, जहाँ उनका इलाज चल रहा है। अस्पताल ने अभी तक उनकी हालत के बारे में कोई जानकारी नहीं दी है।