ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे यांचे निधन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:52 IST2019-05-08T06:52:07+5:302019-05-08T06:52:32+5:30

ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे यांचे मंगळवारी रात्री मुलुंड येथील रुग्णालयात निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, कन्या, जावई आणि नात असे कुटुंब आहे.

Veteran artist Waman Tawde passed away | ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे यांचे निधन  

ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे यांचे निधन  

मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे यांचे मंगळवारी रात्री मुलुंड येथील रुग्णालयात निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, कन्या, जावई आणि नात असे कुटुंब आहे. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना चार दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी सकाळी १० वाजता मुलुंडच्या टाटा कॉलनी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांनी कन्स्ट्रक्शन, पिदी, मी घोडा हुसेनच्या चित्रातला, रायाची रापी आदी एकांकिका तसेच छिन्नं, इमला, रज्जू, चौकोन आदी नाटकांचे लेखन केले होते.

 

Web Title: Veteran artist Waman Tawde passed away

टॅग्स :Mumbaiमुंबई