Join us

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 08:18 IST

मराठी रंगभूमी आणि चित्रपटात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे शनिवारी निधन झाले. 

मुंबईः मराठी रंगभूमी आणि चित्रपटात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे शनिवारी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. 

मराठी व्यावसायिक रंगभूमी, इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन आणि जाहिरातींमध्ये किशोर प्रधान यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे. 'शिक्षणाचा आयचा घो', 'लालबाग परळ', 'भिंगरी', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' यासारख्या गाजलेल्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. 

याशिवाय, 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटातील खट्याळ आजोबा, 'जब वुई मेट'मधील स्टेशन मास्तर या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम राहतील. तसेच, दूरदर्शन वाहिनीवरील गजरा कार्यक्रम त्यांनी पत्नी शोभासोबत सादर केला होता.

टॅग्स :मराठीसिनेमा