वर्सोव्यात महापौरांनी लुटला पैठणी खेळाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:34 IST2021-02-05T04:34:52+5:302021-02-05T04:34:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांनी वर्सोव्यात सुमारे एक तास पैठणी खेळाचा मनमुराद आनंद ...

In Versova, the mayor looted the joy of the Paithani game | वर्सोव्यात महापौरांनी लुटला पैठणी खेळाचा आनंद

वर्सोव्यात महापौरांनी लुटला पैठणी खेळाचा आनंद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांनी वर्सोव्यात सुमारे एक तास पैठणी खेळाचा मनमुराद आनंद लुटला.

प्रभाग क्र. ५९ च्या शिवसेना नगरसेविका प्रतिमा खोपडे व शाखाप्रमुख सतीश परब, बेबी पाटील आयोजित "खेळ पैठणीचा २०२१" या कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर उत्साहाने सहभागी झाल्या. वर्सोवा, यारी रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर शाळेत या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. रस्सीखेच, रॅंपवॉक, नाच, उखाणे या विविध खेळांचा महापौरांनी आनंद लुटला. येथील महिलांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शिवसेनेने व प्राचार्य अजय कौल यांनी केलेल्या शानदार आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. अशा प्रकारच्या आयोजनामुळे आपली एकीकडे संस्कृती जपली जात असताना दुसरीकडे महिलांच्या कलागुणांना वाव मिळतो, असे गौरवोद्गार महापौरांनी काढले.

महापौरांचा सन्मान कोविडयोद्धा म्हणून प्रिं. अजय कौल यांच्या हस्ते करण्यात आला, तर शिवसेनेच्या प्रत्येक समाजकार्यात मदतीचा हात देणारे प्रिं. अजय कौल व प्रशांत काशीद यांचा सन्मान शाखेच्या वतीने महापौरांच्या हस्ते करण्यात आला.

---------------------------------------------

Web Title: In Versova, the mayor looted the joy of the Paithani game